एकाच दिवशी भाजपला सलग दोन मोठे झटके!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

नवी दिल्ली | लोकसभा निवडणूक जवळ आली असून सर्वच पक्ष त्यासाठी तयारीला लागले आहेत. अशात सर्वच भाजपच्या (Bjp)  उमेदवार यादीची प्रतीक्षेत असल्याचं पाहायला मिळतंय. असं असताना भाजपला एकाच दिवशी सलग दोन झटके बसले आहेत.

भाजपला एका दिवशी सलग दोन झटके

अवघ्या 24 तासांमध्ये दोन खासदारांनी राजकारणाला तडकाफडकी रामराम केल्याने खळबळ उडाली आहे. गौतम गंभीर आणि जयंत सिन्हा या खासदारांनी राजकारणात रामराम करणार असल्याची घोषणा केली आहे.

गंभीरने पुन्हा क्रिकेटशी निगडीत बाबींवर लक्ष केंद्रित करण्यासाठी निर्णय घेतला असल्याचे म्हटले आहे. जयंत सिन्हा यांनी राजकारणातून बाजूला होत भारत आणि जगभरातील जागतिक हवामान बदलांना तोंड देण्यासाठी माझे प्रयत्न केंद्रित करू शकेन, असं म्हटलं आहे.

खासदार जयंत सिन्हाचा राजकारणाला रामराम

हजारीबागचे खासदार जयंत सिन्हा यांनी निवडणुकीच्या जबाबदारीतून मुक्त होण्याची मागणी केली आहे. मी पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांना माझ्या थेट निवडणुकीच्या कर्तव्यातून मुक्त करण्याची विनंती केली आहे जेणेकरून मी भारत आणि जगभरातील जागतिक हवामान बदलांना तोंड देण्यासाठी माझे प्रयत्न केंद्रित करू शकेन, असं सिन्हा यांनी म्हटलंय.

याआधी खासदार गौतम गंभीरने असेच ट्विट करून जेपी नड्डा यांना निवडणूक ड्युटीतून मुक्त करण्याची मागणी केली होती. त्यांच्या विनंतीनंतर काही तासांनी जयंत सिन्हा यांनीही ट्विट करून अशीच मागणी केली आहे.

गौतम गंभीरने 22 मार्च 2019 रोजी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. भाजपने पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. गौतम गंभीरने आम आदमी पार्टीचे आतिशी आणि काँग्रेसचे अरविंदर सिंग लवली यांचा पराभव करून ही जागा जिंकली होती.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘या’ तीन कामानंतर अंघोळ करणं आवश्यक, अन्यथा…

देशात खळबळ! राहुल गांधी यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी

‘जग जिंकत होते, तेव्हा लोक म्हणाले संसार…’, सानिया मिर्झाची पोस्ट चर्चेत

पुणे हादरलं! ‘या’ भागातून तब्बल 2 कोटींचं ड्रग्स जप्त

महेंद्रसिंग धोनी IPL मधून कधी संन्यास घेणार?, जवळच्या व्यक्तीनं सगळं गुपित सांगून टाकलं