महेंद्रसिंग धोनी IPL मधून कधी संन्यास घेणार?, जवळच्या व्यक्तीनं सगळं गुपित सांगून टाकलं

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

IPL 2024, MS Dhoni: भारतीय क्रिकेट संघाचा (Team India) माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) आयपीएलमध्ये धमाका करण्यासाठी सज्ज झाला आहे. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्त्वात चेन्नई सुपर किंग्सने 2023 (Chennai Super Kings) साली पाचवं टायटल आपल्या नावे केलं. असं सांगितलं जातंय की हा आयपीएलचा सीझन महेंद्रसिंग धोनीचा शेवटचा सीझन असण्याची शक्यता आहे.

मागील काही महिन्यांपासून महेंद्रसिंग धोनी क्रिकेटमधून संन्यास घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या वर्षी आयपीएलचा शेवटचा सामना झाल्यावर धोनीने यासंदर्भात भाष्य केलं होतं. 2024 सालची आयपीएल खेळण्याची आपली इच्छा असल्याचं त्याने सांगितलं होतं.

महेंद्रसिंग धोनी गुडघ्यामुळे त्रस्त-

आयपीएल स्पर्धेदरम्यान महेंद्रसिंग धोनीला गुडघेदुखीच्या त्रासाचा सामना करावा लागला होता, मात्र असं असलं तरी त्याने विकेटकीपर म्हणून आपली जबाबदारी चांगल्या तऱ्हेनं निभावली होती. एवढंच नव्हे तर संधी मिळाल्यावर चांगल्या धावा सुद्धा केल्या होत्या.

आयपीएलचा (IPL 2023) हंगाम संपल्यानंतर महेंद्रसिंग धोनीनं आपल्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया केली. त्यानंतर धोनीनं पुन्हा आपलं लक्ष क्रिकेटवर केंद्रीत केलं, आता पुन्हा एकदा धोनी आपीएलचा नवा सीझन खेळण्यासाठी सज्ज झाला आहे.

Deepak Chahar reaction to MS Dhoni

MS Dhoni संन्यास घेणार असल्याच्या चर्चा-

आयपीएल 2023 संपल्यावर महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) क्रिकेटमधून संन्यास घेईल, असं सांगितलं जात होतं, त्यामुळे 2023 सालच्या आयपीएल मध्ये चेन्नईच्या सर्व सामन्यांना धोनीच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती.

आपल्या आवडत्या क्रिकेटपटूला शेवटचं खेळताना पाहण्याची अनेक क्रिकेट रसिकांची इच्छा होती. याची देही याची डोळा स्टेडियममध्ये धोनीला पाहण्यासाठी त्यामुळेच मोठी गर्दी स्टेडियमवर होताना आपण पाहिली होती.

धोनीच्या निवृत्तीच्या (Dhoni Retirement) चर्चा खूपच जोरात होत्या. 2023 सालची आयपीएल याच कारणामुळे गाजली. त्यातच फायनलमध्ये चेन्नई सुपर किंग्जनं गुजरात टायटन्सला (Gujrat Titans) हरवून आयपीएलचं आणखी एक टायटल (IPL Title) स्वतःच्या नावे केलं. मात्र धोनीनं आपण आणखी खेळणार असल्याचं जाहीर करुन चाहत्यांना सुखद धक्का दिला.

धोनीच्या मित्रानं केला मोठा खुलासा-

धोनी 2023 साली निवृत्त नाही झाला मात्र आता 2024 सालचा आयपीएलचा हंगाम संपल्यानंतर धोनी निवृत्ती घोषित करेन, असा अनेकांचा कयास आहे. धोनीने याबद्दल अद्याप कुठलंही भाष्य केलेलं नाही. मात्र धोनीचा जीवलग मित्र परमजीत सिंह (Paramjeet Singh Viral Video) याचा एक व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

MS Dhoni

IPL 2024: परमजित सिंहनं काय खुलासा केला?-

महेंद्रसिंग धोनीचा मित्र परमजित सिंहचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि शेअर मिळताना दिसत आहेत. परमजितसिंह या व्हिडीओमध्ये धोनीच्या फिटनेसबद्दल बोलताना दिसत आहे.

IPL 2024 खेळण्यासाठी धोनी सध्या संपूर्णपणे फीट आहे. महेंद्र सिंह धोनी (MS Dhoni Fitness) सध्या आपल्या फिटनेसवरच सगळं लक्ष देत आहे. धोनी सध्या इतका फीट आहे की तो आयपीएलचा एकच नव्हे तर दोन हंगाम (IPL 2024 Timetable) खेळू शकतो, असं परमजीत सिंहनं म्हटलं आहे. 

तुम्हाला माहिती असेलच की धोनीने 2024 च्या आयपीएलची सध्या तयारी सुरु केली आहे. स्वतः धोनीने त्याच्या निवृत्तीचे अद्याप संकेत दिलेले नाहीत. अशा परिस्थितीत गेल्या वर्षी त्याच्या निवृत्तीची चर्चा होती, मात्र आता परमजीत सिंह यांच्या वक्तव्यानंतर नवी चर्चा सुरु झाली आहे.

MS Dhoni

धोनी 2025ची आयपीएल सुद्धा खेळणार!

धोनीचा मित्र परमजित सिंह म्हणाला की धोनीच्या फिटनेसवर शंका घेण्याचं काहीही कारण नाही. धोनी सध्या नेटमध्ये जोरदार घाम गाळत आहे. यंदाच्या सीझनमध्ये (Chennai Super Kings Matches) त्याच्या बॅटमधून चांगल्या धावा नक्कीच निघतील. मात्र या सगळ्या चर्चा आहे धोनी आयपीएलचा 2025 सालचा हंगाम खेळण्याची…

धोनीच्या फिटनेसचा दाखला देताना परमजीत म्हणाला की धोनी आयपीएलचे आणखी दोन हंगाम खेळू शकतो इतका फिट आहे. त्यामुळे मित्राच्या या वक्तव्यामुळे धोनी सध्या तरी यंदाच्या हंगामानंतर निवृत्तीची घोषणा करण्याची शक्यता नसल्याचं बोललं जात आहे.

धोनीबद्दल आणखी बातम्या-

MS Dhoni | धोनी CSK साठी IPL किती वर्ष खेळणार?; ‘या’ खेळाडूनं सांगितलं

IPL फायनलची तारीख ठरली; धोनीच्या गडातून होणार स्पर्धेची सुरूवात!

MS Dhoni | IPL पूर्वीच धोनीला मोठा धक्का, जवळच्याच मित्राने केला घात; जाणून घ्या नेमकं प्रकरण

MS Dhoni | महेंद्रसिंग धोनी सापडला मोठ्या संकटात, ‘या’ कारणामुळे दाखल झाली केस

MS Dhoni | धोनीचा जर्सी क्रमांक 7 कुणाला मिळणार?, BCCIचा सर्वात मोठा निर्णय