IPL फायनलची तारीख ठरली; धोनीच्या गडातून होणार स्पर्धेची सुरूवात!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

IPL 2024 | सर्वात लोकप्रिय ट्वेंटी-20 लीग अर्थात आयपीएल लवकरच सुरू होणार आहे. इंडियन प्रीमिअर लीगच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे, आयपीएल सुरू होण्याची तारीख निश्चित झाली आहे. यंदाचा आयपीएल हंगाम 22 मार्चपासून सुरू होणार आहे, तर पहिला सामना चेन्नईत होणार आहे. चेन्नईत अर्थात महेंद्रसिंग धोनीच्या गडात उद्घाटन सोहळ्याची तयारी सुरू झाली असून आता सर्वांनाच या तारखेची प्रतीक्षा आहे.

आयपीएल 2024 ला 22 मार्चपासून सुरूवात होणार आहे. या हंगामातील पहिल्या टप्प्याचे वेळापत्रक गुरुवारी जाहीर केले जाऊ शकते, तर उर्वरित वेळापत्रक निवडणुकीच्या तारखा लक्षात घेऊन जाहीर केले जाईल. यावेळी आयपीएलचा पहिला सामना चेन्नईत खेळवला जाणार आहे, म्हणजेच पहिला सामना धोनीच्या संघाच्या घरच्या मैदानावर होणार आहे.

22 मार्चला सलामीचा सामना

‘क्रिकबज’ने दिलेल्या वृत्तानुसार, आयपीएलचे अध्यक्ष अरुण सिंग धुमल यांनी 22 मार्च रोजी चेन्नई येथे लीग सुरू होण्यास मंजुरी दिली. आयपीएलचे वेळापत्रक गुरुवारी सायंकाळी 5 वाजता जाहीर केले जाऊ शकते. सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथन म्हणाले की, चेन्नईमध्ये उद्घाटन सोहळा आयोजित करण्याचा बहुमान आम्हाला मिळाला ही अतिशय आनंदाची बाब आहे.

नेहमी मागील हंगामातील फायनलिस्ट संघांमध्ये सलामीचा सामना खेळवला जातो. त्यामुळे उद्घाटनाच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात लढत होईल. मागील वर्षी चेन्नईने गुजरातला नमवून पाचव्यांदा आयपीएलचा किताब जिंकला होता. त्यामुळे 22 मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना पाहायला मिळेल. मात्र, आयपीएलकडून अद्याप याची पुष्टी झालेली नाही, त्यामुळे सर्वजण वेळापत्रकाची वाट पाहत आहेत.

IPL 2024 चा थरार

यावेळी लोकसभेच्या निवडणुकाही होणार आहेत, अशा परिस्थितीत आयपीएल देशाबाहेर शिफ्ट होण्याची भीती सर्वांनाच होती. तसेच स्पर्धेच्या तारखांमध्ये काही बदल होऊ शकतात, अशा स्थितीत आता आयपीएलच्या पहिल्या टप्प्याचे वेळापत्रक जाहीर होईल आणि त्यानंतर निवडणुकीच्या तारखांनुसार शेवटच्या टप्प्याचे वेळापत्रक जाहीर केले जाईल, असे मानले जात आहे.

सुरुवातीला पहिल्या 15 दिवसांचे वेळापत्रक जाहीर केले जाईल, त्यानंतर उर्वरित वेळापत्रक निवडणुकीनुसार समोर येईल. तसेच असे मानले जात आहे की, आयपीएल 2024 चा अंतिम सामना 26 मे रोजीच होऊ शकतो. खरं तर असे बोलले जात आहे की कॅप्टन कूल धोनीची ही शेवटची आयपीएल असू शकते.

News Title – IPL 2024 will start from Chennai on March 22 and the final match will be played on May 26
महत्त्वाच्या बातम्या –

…तर खेळाडूंना मिळणार 1 कोटी अन् BMW कार; HCA ची मोठी घोषणा

बारामतीच्या राजकारणात आणखी एक पवार, अजित पवारांचं टेंशन वाढणार?

मॉडेलच्या आत्महत्या प्रकरणी ‘हा’ स्टार खेळाडू अडचणीत; ‘तो’ शेवटचा फोन कॉल…

‘आरक्षणाची लढाई सोडून द्या, कारण…’; गुणरत्न सदावर्तेंचा मराठा तरुणांना सल्ला

गोल्डनमॅन पंढरीशेठ फडके यांच्या मृत्यूचं कारण आलं समोर!