Pandharisheth Phadake | महाराष्ट्र बैलगाडा असोसिएशनचे अध्यक्ष पंढरीशेठ फडके (Pandharisheth Phadake) यांचं निधन झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. पनवेल येथील विहिघर गावातील पंढरीशेठ फडके (Pandharisheth Phadake) यांना आपल्या चारचाकी वाहनामध्ये हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचं निधन झालं असल्याची माहिती समोर आली आहे. बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये त्यांनी मोलाचं काम केलं आहे. त्यांच्या जाण्यानं पनवेल शहर आणि बैलगाडा असोसिएशन शोकाकूल झालं आहे.
बैलगाडा शर्यतीसाठी मोलाचं योगदान
पंढरीशेठ फडके (Pandharisheth Phadake) यांनी अनेक वर्षांपासून बैलगाडा शर्यतींसाठी मोलाचा हातभार लावला आहे. अनेक वर्षांआधी बैलगाडा शर्यतींवर बंदी घालण्यात आली होती. हे प्रकरण कोर्टामध्ये गेले होते, यावेळी पंढरीशेठ यांनी बैलगाडा प्रेमींना जवळ करत काही नेत्यांच्या मदतीने लढा दिला होता अशा चर्चा समोर येत आहेत. त्यांचे काही वैयक्तिक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असल्याने कोकणभागापासून ते पश्चिम महाराष्ट्रात पंढरी शेठ फडके हे नाव अगदी लहानग्यांनाही तोंड पाठ झाले होते.
गोल्डन मॅन ओळख
त्यांच्या गळ्यामध्ये किलोभर सोनं आणि डोक्यावर पांढरी टोपी कुरता अन् पायजमा असे गोल्डन मॅन म्हणूनही त्यांची ओळख होती. बैलगाडा शर्यती पाहण्यासाठी ते आपल्या गाडीच्या टपावर बसायचे. अनेकदा ते आपल्या गाडीच्या टपार बसून त्यांनी नाच देखील केला आहे. त्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
View this post on Instagram
बैलगाडा शर्ययतीला ग्लॅमर मिळवून देणारं नाव म्हणून पंढरीशेठ यांना आता अनेक लोकं ओळखत आहेत. राज्यातील कोणत्याही भागामध्ये बैलगाडा शर्यत भरवल्यानंतर पंढरीशेठ तिथं उपस्थित असायचे. पंढरीशेठ यांना बैलगाडा शर्यतीचा नाद 1986 सालापासून लागला होता. बैलगाडा शर्यतीसोबत त्यांनी आपले आयुष्य काही काळ हे राजकारणामध्येही घालवलं. सुरूवातीला ते शेकापमध्ये होते त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला होता.
पंढरीशेठ फडके गाणी
पंढरीशेठ यांनी बैलगाडा शर्यतीला ग्लॅमर आणलं तसेच त्यांची काही गाणी आजही प्रसिद्ध आहेत. ती गाणी महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहेत. ‘पंढरीशेठ फडके विहिघरवाला’, 1010 नंबर सरकार वाल्याचा दरारा, या गाण्यांना कोट्यवधी लोकांनी पाहिलं आणि ऐकलं आहे. तसेच काही महिन्यांआधी त्याचं ‘मला अटक करा पुण्यात’, हे गाणं आलं होतं आता हे गाणं देखील सोशल मीडियावर धिंगाणा घालत आहे.
मागील वर्षामध्ये पंढरीशेठ फडके आणि राहुल पाटील यांच्यामध्ये अंबरनाथमध्ये गोळीबार झाला होता. हे प्रकरण अधिकच चर्चेत आले होते. त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत होते. तेव्हा याप्रकरणामध्ये ते जामीनावर बाहेर सुटून आले. तसेच टेनिस क्रिकेट सामन्यामध्ये त्यांनी मैदानावरून येताना हवेत गोळीबार केला होता.
News Title – Pandharisheth Phadake passed away
महत्त्वाच्या बातम्या
WPL 2024 चं बिगुल वाजणार; ‘या’ शहरात होणार सामने, वाचा सविस्तर
मराठा समाजाला मोठा धक्का!, सरकारनं दिलेलं नवं आरक्षण पुन्हा कोर्टाच्या फेऱ्यात
पुणे हादरलं! ड्रग्ज रॅकेटबाबत धक्कादायक खुलासा समोर
मनोज जरांगे सरकारवर भडकले; केली महत्त्वाची मागणी
“आमदाराने रिसॉर्टवर बोलावलं अन्..”, प्रसिद्ध अभिनेत्रीबाबत खळबळजनक खुलासा