‘आरक्षणाची लढाई सोडून द्या, कारण…’; गुणरत्न सदावर्तेंचा मराठा तरुणांना सल्ला

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Gunaratna Sadavarte | राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी आंदोलनं सुरू आहेत. जरांगे पाटील यांनी जोवर आरक्षण मिळणार नाही तोवर उपोषण सोडणार नाही, असा इशारा दिला आहे. दरम्यान सरकारने जरांगेंच्या काही मागण्या मान्य करत काल एक दिवसीय अधिवेशन घेतलं. यावेळी मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देण्यात आलं आहे. मात्र तरी सुद्धा जरांगेंनी अद्यापही आंदोलन मागे घेतलं नाहीये. या गोष्टी सुरु असताना अॅड गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा तरुणांना सल्ला दिला आहे.

काय म्हणाले सदावर्ते?

माध्यामांशी बोलत असताना (Gunaratna Sadavarte) सदावर्तेंनी जरांगेवर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की, अंतरवाली सराटीमध्ये जखमी झालेल्या लोकांची जबाबदारी त्यांची आहे. अंतरवालीत जखमी झालेल्या पोलिसांना राष्ट्रपती पदक द्या, अशी मागणी सदावर्ते यांनी केली. पुढे ते म्हणाले की, ‘मराठा समाजातील तरूणांनी आरक्षणाची लढाई सोडून द्यावी, त्यांनी अभ्यासावर लक्ष द्यावं.’

आता राज्य सरकारने स्वतंत्र दिलेलं दहा टक्के आरक्षण, केंद्राने दिलेले EWS आर्थिकदृष्ट्या दुर्बल विभागातील आरक्षण यातील टक्केवारी बघा 85 टक्के आहे, असे सांगत जे पदरचं आहे ते सोडून द्यायचं, असं देखील सदावर्ते (Gunaratna Sadavarte) म्हणाले.

आरक्षणाचा लाभ घ्या-

ज्यावेळेस तुम्ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल विभागातील आरक्षणाबद्दल विचारता त्याचा लाभ घेतात त्यावेळेस तुम्हाला इतर कोणतही दुसरं आरक्षण घेता येत नसल्याची माहिती गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte ) यांनी दिलीये. तर आताच्या कायद्यातील सेक्शन 4 चा जर अभ्यास केला तर त्यात तेच म्हटलं आहे. त्यामुळे मराठ्यांनी आरक्षणाच्या मागे लागू नये, असं सदावर्ते म्हणाले.

जरांगेंचं टप्प्यात आंदोलन-

शिक्षण आणि नोकरीसाठी 10 टक्के आरक्षण दिलं असलं तरी मात्र, जरांगेंना हे आरक्षण मान्य नाही, असं जरांगे म्हणालेत. आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण हवं आहे. पुढे ते म्हणाले की, आता आम्ही पुन्हा एकदा आंदोलन करु मात्र, आता टप्प्यात आंदोलन करणार आहे. टप्प्याशिवाय आंदोलन करणार नाही. पहिल्याच टप्प्यात त्यांना चांगला दणका बसणार आहे, असं ते म्हणालेत.

News Title : Gunaratna Sadavarte gives advice to maratha youth

महत्तावाच्या बातम्या-

WPL 2024 चं बिगुल वाजणार; ‘या’ शहरात होणार सामने, वाचा सविस्तर

मराठा समाजाला मोठा धक्का!, सरकारनं दिलेलं नवं आरक्षण पुन्हा कोर्टाच्या फेऱ्यात

पुणे हादरलं! ड्रग्ज रॅकेटबाबत धक्कादायक खुलासा समोर

मनोज जरांगे सरकारवर भडकले; केली महत्त्वाची मागणी

“आमदाराने रिसॉर्टवर बोलावलं अन्..”, प्रसिद्ध अभिनेत्रीबाबत खळबळजनक खुलासा