पुणे हादरलं! ड्रग्ज रॅकेटबाबत धक्कादायक खुलासा समोर

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Pune News | पुणे हे विद्येचं माहेरघर म्हणून देशभरामध्ये ओळखलं जातं. मात्र आता या शहराची जागा ही गुन्हेगारीनं घेतली आहे. सुसंस्कृत पुणे शहरामध्ये अनेक वर्षांपासून ड्रग्ज रॅकेट (Pune MD Drugs Racket) सुरू असल्याचं अनेकदा उघड झालं आहे. काही महिन्याआधी ललित पाटील ससून रूग्णालयातून पळाला. हा देखील एक ड्रग्ज रॅकेटचा (Pune MD Drugs Racket) भाग होता. अशातच आता आणखी एक पुण्यातील ड्रग्ज रॅकेटबाबत (Pune MD Drugs Racket) धक्कादायक खुलासा समोर आला आहे.

2000 किलो ड्रग्ज सापडले

पुणे पोलीस ड्रग्ज प्रकरणाबाबतची माहिती काढण्यासाठी दिल्लीमध्ये जाताना दिसत आहे. 2000 किलो ड्रग्ज सापडले असून त्यामध्ये सॅम ब्राऊन या परदेशी व्यक्तीचं नाव या ड्रग्ज प्रकरणाशी जोडलं गेलं आहे. पोलीस त्याचा शोध धेत असून याप्रकरणामध्ये 5 जणांना अटक करण्यात आली आहे. याबाबतच्या मास्टरमाईंडचा खुलासा झाला आहे.

पुणे ड्रग्ज रॅकेट प्रकरणामध्ये अटक केलेल्या आरोपींनी धक्कादायक माहिती दिली आहे. आरोपींना 3 महिन्यांमध्ये 2000 किलो ड्रग्ज बनवण्याचं टार्गेट दिलं असल्याची माहिती स्वत: आरोपींनी दिली आहे. यामध्ये युवराज भुजबळ या तरूणाला डोंबिवलीतून अटक केली होती.

पुणे पोलीस मास्टरमाईंडच्या शोधात

युवराज भुजबळला एमडी ड्रग्ज बनवण्याचा फॉर्म्युला दिला होता. दरम्यान युवराज भुजबळ आणि अनिल साबळे यांनी कुरकुंभ येथे एमडी ड्रग्जचा कारखाना बनवण्यात आला होता. यामुळे आता पुणे पोलीस मास्टरमाईंडच्या शोधात आहेत.

देशातील विविध दहा शहरांमध्ये या प्रकरणाचा शोध घेण्यात आला असल्याचं बोललं जात आहे. पुणे पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. पुणे पोलिसांनी आपल्यासोबत एनसीबी पथकाची मदत घेतली आहे. दिल्ली, बेंगलोर, हैद्राबाद सारख्या शहरांमध्ये सध्या तपास सुरू असल्याचं समजतंय. अशातच दिल्लीतून 20 फेब्रुवारीला 1800 किलो ड्रग्ज रॅकेट सापडल्याची माहिती आता समोर आली आहे.

‘हे’ आरोपी अटकेत

विकी माने, हैदर शेख, अनिल साबळे, अजय करोसिया आणि युवराज भुजबळ या ड्रग्ज प्रकरणातील आरोपींना  पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ड्रग्ज प्रकरणातील एका इंजिनिअरला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. पुणे ड्रग्ज प्रकरणाचे कनेक्शन हे सांगलीशी असल्याची माहिती आहे.

News Title- Pune MD Drugs Racket

महत्त्वाच्या बातम्या

रेडिओवरचा लोकप्रिय आवाज हरपला! अमीन सयानी यांचं वयाच्या 91 व्या वर्षी निधन

करीना कपूरला बघून सर्वांसमोरच शाहिद कपूरने केलं असं काही की…; पाहा व्हिडिओ

‘सिरियल किसर’ इमरान हाश्मीचा धक्कादायक खुलासा, म्हणाला..

सानिया मिर्झाचं नाव घेताच भडकली सना जावेद, व्हिडीओ तूफान व्हायरल

धोनीनं अन्याय केला, माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यावी; क्रीडा मंत्र्याचे गंभीर आरोप