धोनीनं अन्याय केला, माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यावी; क्रीडा मंत्र्याचे गंभीर आरोप

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

MS Dhoni | महेंद्रसिंग धोनी म्हणजे भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील एक मोठे नाव. धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघाने सर्वाधिक तीनवेळा आयसीसीचा किताब जिंकला आहे. कॅप्टन कूल धोनी नेहमी प्रसिद्धीच्या झोतात असतो. आता भारताचा माजी खेळाडू मनोज तिवारीने धोनीवर गंभीर आरोप केले आहेत. बंगाल क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मनोज तिवारीने रणजी ट्रॉफी 2024 च्या शेवटच्या साखळी सामन्यानंतर निवृत्तीची घोषणा केली. मनोज हा राजकारणाशीही सक्रियपणे जोडलेला आहे आणि तो बंगाल राज्य सरकारमध्ये क्रीडा मंत्री आहे.

क्रिकेटपटू म्हणून ओळख मिळवल्यानंतर मनोज तिवारीने राजकीय खेळी सुरू केली. राजकारणात सक्रिय असताना देखील तो रणजी ट्रॉफी खेळत होता. आता क्रिकेटला रामराम केल्यानंतर मनोजने एकापाठोपाठ एक वक्तव्य करून खळबळ उडवून दिली आहे. त्याने टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीवर निशाणा साधत त्याच्यावर पक्षपाताचा आरोप केला आहे.

क्रिकेटर अन् राजकीय नेता

2008 मध्ये टीम इंडियासाठी पदार्पण करणाऱ्या मनोजने 12 वन डे आणि तीन ट्वेंटी-20 सामने खेळले आहेत. डिसेंबर 2011 मध्ये त्याने चेन्नई येथे वेस्ट इंडिजविरुद्ध नाबाद 104 धावा करत आपले पहिले आंतरराष्ट्रीय शतक झळकावले. मात्र, पुढची संधी मिळण्यासाठी त्याला आणखी 7 महिने वाट पाहावी लागली.

मनोज तिवारीने आता क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. धोनीबद्दल बोलताना तिवारीने सांगितले की, माजी कर्णधार धोनीने मला संघातून का वगळले? मी शतक झळकावून आणि ‘सामनावीर’चा पुरस्कार जिंकूनही मला सलग 14 सामन्यांसाठी बाहेर का ठेवले गेले? विराट कोहली, रोहित शर्मा आणि सुरेश रैना यांसारखे काही अव्वल खेळाडू त्या मालिकेत धावा काढण्यासाठी धडपडत असताना 2012 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी माझ्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. एकूणच धोनीने माझ्यावर अन्याय का केला याचे उत्तर अद्याप मिळाले नसल्याचे तिवारीने नमूद केले.

MS Dhoni वर तिवारीचे आरोप

दरम्यान, मनोज तिवारीने 2008 साली पदार्पण केले तेव्हा त्याला पहिल्या सामन्यात केवळ 2 धावा करता आल्या होत्या. मनोज संघात सामील झाला त्यावेळी सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीरसारखे दिग्गज खेळाडू संघाचा भाग होते. अशा परिस्थितीत संघातील स्थान टिकवणे त्याच्यासाठी खूप कठीण होते.

पदार्पणाच्या सामन्यात फ्लॉप ठरल्यानंतर मनोज तिवारीला संघातून वगळण्यात आले. मनोजने देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आणि त्यानंतर विश्वचषक 2011 नंतर त्याला पुन्हा भारतीय संघाचे तिकिट मिळाले. 2011 मध्ये त्याला एकूण 5 वन डे सामने खेळण्याची संधी मिळाली ज्यात त्याने 2, 22, 11, 24 आणि 104 धावा केल्या. शतकापूर्वी तो सलग चार डावांत फ्लॉप ठरला होता.

News Title- Former Indian player and West Bengal Sports Minister Manoj Tiwari has questioned why MS Dhoni dropped me from Team India
महत्त्वाच्या बातम्या –

अखेर ठरलं! ‘या’ ठिकाणी होणार IPL चे सामने; तारीखही आली समोर

चाणक्याच्या ‘या’ 4 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, खिसा कायम पैशांनी भरलेला राहील!

लग्नाला 2 वर्ष झाली तरी पतीने शारीरिक संबंध ठेवले नाहीत; पत्नीचा आरोप, 6 जणांवर गुन्हा दाखल

भारतीय क्रिकेटमधील 2 दिग्गज ‘भाजप’त जाणार? लोकसभा लढण्याची शक्यता

विद्या बालनच्या अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची मुंबई पोलिसांत धाव, प्रकरण काय?