अखेर ठरलं! ‘या’ ठिकाणी होणार IPL चे सामने; तारीखही आली समोर

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

IPL 2024 | भारतात आयपीएल लीग सर्वाधिक महागडी आणि प्रसिद्ध अशी आहे. जगभरात आयपीएलबद्दल बोललं जातं. 2024 मधील आयपीएल सामने आता लवकरच होणार आहे. मात्र ही स्पर्धा (IPL 2024) नेमकी कुठे होणार?, याबाबत गेल्या अनेक दिवसापासून चर्चा रंगत होत्या. अखेर या संदर्भात निर्णय झाला आहे.

‘आयपीएल’चे अध्यक्ष अरुण धुमल यांनी याबाबत माहिती दिली आहे. ‘आयपीएल’च्या 17 व्या सत्राचा कार्यक्रम कधी सुरु होणार आहे, याचा खुलासा आता झाला आहे. त्यामुळे क्रिकेटप्रेमींची प्रतिक्षा संपली आहे.

‘या’ ठिकाणी होणार IPL 2024 चे सामने

लोकसभा निवडणुकीमुळे इंडियन प्रीमियर लीगचे (आयपीएल) स्पर्धा कुठे होणार, याबाबत संभ्रम होता. अखेर याचा खुलासा झाला आहे. अरुण धुमल यांनी आयपीएलचे सामने भारतातच होणार असल्याचे सांगितले आहे. तसेच ही स्पर्धा येत्या 22 मार्चपासून सुरू होणार आहे. तर, अंतिम सामना 26 मे ला होण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीमुळे बदल

भारतात लोकसभा निवडणुकांचा डंका लवकरच वाजणार आहे. मार्च महिन्यातच निवडणुकाच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या आयपीएल स्पर्धेच्या सुरुवातीचा केवळ 15 दिवसांचा (IPL 2024) कार्यक्रम जाहीर करण्यात येणार आहे. पुढे लोकसभा निवडणुकांच्या तारखा लक्षात घेऊन उर्वरित सामन्यांचा कार्यक्रम जाहीर होईल.

यापूर्वी जेव्हा 2009 साली निवडणुका होत्या तेव्हा आयपीएलची स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत घेण्यात आली होती. तर, 2014 मध्ये काही सामने यूएई मध्ये झाले होते. आता पुन्हा लोकसभा निवडणुका असल्याने स्पर्धा दुबईमध्ये होण्याची चर्चा होती.

पहिला सामना ‘या’ संघांत होणार?

आयपीएलचा पहिला सामना गतविजेता (IPL 2024) आणि उपविजेतामध्ये होतो. यामुळे यंदाही पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यामध्ये होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यंदाच्या सीझनमध्ये मिचेल स्टार्क हा सर्वाधिक महागडा खेळाडू ठरला आहे. त्याच्यावर कोलकाता नाईट रायडर्स संघाने 24.75 कोटी रुपयांची बोली लावली आहे. त्यामुळे सर्वांची नजर यावेळी त्याच्या खेळीकडे असणार आहे.

News Title- IPL 2024 will be held in India from March 22

महत्त्वाच्या बातम्या –

विराट-अनुष्काच्या लेकाचे नाव ‘अकाय’, जाणून घ्या याचा अर्थ

राहुल गांधी यांचं ऐश्वर्या रायबद्दल विधान अन् चाहते संतापले!

दीपिका आणि रणवीर सिंह यांच्याबाबत महत्त्वाची माहिती समोर, लवकरच…

ऐश्वर्या आणि अभिषेकच्या लेकीची शाळेची फीस माहितीये का?; आकडा वाचून थक्क व्हाल

रोहित शर्माच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी!