विराट-अनुष्काच्या लेकाचे नाव ‘अकाय’, जाणून घ्या याचा अर्थ

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Virat Kohli | भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू आणि आघाडीचा फलंदाज विराट कोहली दुसऱ्यांदा बाप झाला आहे. त्याची पत्नी अन् बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने मुलाला जन्म दिला आहे. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा दुसऱ्यांदा पालक बनले आहेत. त्यांनी त्यांच्या मुलाचे नाव ‘अकाय’ असे ठेवले आहे. पण या नावाचा अर्थ काय? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. अकाय हे नाव सोशल मीडियावर सतत ट्रेंड करत आहे.

माहितीनुसार, अकाय हे नाव वर्धा हिंदी शब्दकोशानुसार ठेवण्यात आले आहे. अकाय म्हणजे ‘निराकार’… म्हणजेच शरीर किंवा आकार आणि रूप नसलेला. विराट कोहलीने सोशल मीडियावर पोस्ट करत दुसऱ्यांदा बाप झाल्याची माहिती दिली आहे. वामिकाचा धाकटा भाऊ अकाय याचे आम्ही स्वागत करतो, असे या पोस्टमध्ये लिहिले आहे.

विरूष्काच्या लेकाचे नाव ‘अकाय’

विराट कोहलीने चाहत्यांना खुशखबर देताना म्हटले की, मी आणि अनुष्का दुसऱ्यांदा पालक झालो आहोत. आमच्या आयुष्यातील या सुंदर क्षणात आम्ही तुमचे आशीर्वाद मागतो. आम्ही तुम्हाला आमची गोपनीयता अशीच कायम राखण्याची विनंती करत आहोत. खरं तर अकाय हे अनोखे नाव असल्याने सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अनेकजण इंटरनेटवर अकाय नावाचा अर्थ शोधत आहेत.

विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्माने 11 जानेवारी 2021 रोजी एका मुलीला जन्म दिला होता. या जोडप्याच्या मुलीचे नाव वामिका आहे. त्याचबरोबर आता विराट कोहली आणि अनुष्का शर्मा दुसऱ्यांदा आई-वडील झाले आहेत. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांची पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

 

Virat Kohli दुसऱ्यांदा झाला बाबा

दरम्यान, वैयक्तिक कारणास्तव विराट कोहली मागील काही दिवसांपासून क्रिकेटपासून दूर आहे. इंग्लंडविरूद्धच्या घरच्या मालिकेतून त्याने माघार घेतली आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. आताच्या घडीला या मालिकेत भारताने 2-1 अशी आघाडी घेतली आहे.

मालिकेतील चौथा कसोटी सामना रांची येथे होणार आहे. या सामन्यात टीम इंडिया वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत असेल. त्याच्या जागी मुकेश कुमारला संधी मिळाली आहे. पदार्पणाच्या सामन्यातील दोन्ही डावांमध्ये अर्धशतक झळकावणाऱ्या सर्फराज खानच्या खेळीकडे सर्वांचे लक्ष असेल.

News Title- Team India player Virat Kohli and Bollywood actress Anushka Sharma have become parents for the second time and have named their son Akaay
महत्त्वाच्या बातम्या –

राहुल गांधी यांचं ऐश्वर्या रायबद्दल विधान अन् चाहते संतापले!

दीपिका आणि रणवीर सिंह यांच्याबाबत महत्त्वाची माहिती समोर, लवकरच…

ऐश्वर्या आणि अभिषेकच्या लेकीची शाळेची फीस माहितीये का?; आकडा वाचून थक्क व्हाल

रोहित शर्माच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी!

‘मला वाटतंय, ऐश्वर्यांने आराध्याला कायमच…’; अभिषेक बच्चनचं लेकीबाबत मोठं वक्तव्य