विद्या बालनच्या अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची मुंबई पोलिसांत धाव, प्रकरण काय?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Vidya Balan | बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. त्याचे कारण तिचे कोणतेही चित्रपट नसून बनावट इंस्टाग्राम अकाउंट हे आहे. नुकतेच विद्या बालनच्या नावाने बनावट इंस्टाग्राम अकाउंट तयार करण्यात आल्याचे समोर आले आहे. यानंतर तिच्या नावाखाली लोकांकडून पैसेही मागितले जात होते. मग अभिनेत्रीने एका अज्ञात व्यक्तीविरोधात मुंबई पोलिसात एफआयआर दाखल केला आहे.

माहितीनुसार, प्रथम काही अज्ञात व्यक्तीने विद्या बालनच्या नावाने इंस्टाग्राम आयडी बनवला. यानंतर जीमेल अकाउंटही तयार करण्यात आले. या दोन अकाउंटच्या माध्यमातून बॉलिवूडशी संबंधित लोकांशी संपर्क साधण्याचा देखील प्रयत्न करण्यात आला आहे. विद्या बालनच्या नावाने सातत्याने फसवणूक केली जात असल्याचे आढळून आले आहे.

अभिनेत्रीची मुंबई पोलिसांत धाव

दरम्यान, विद्या बालनच्या नावाने बनावट अकाउंट तयार करण्यात आले आहे. हा अज्ञात व्यक्ती नोकरीचे आश्वासन देऊन लोकांकडे पैशांची मागणी करत होता. मात्र, ही माहिती विद्या बालनपर्यंत पोहोचताच तिच्या नावाने बनावट खाते सुरू असल्याची माहिती समोर आली. त्यामुळे अभिनेत्रीने यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली. याप्रकरणी विद्या बालनने मुंबई पोलिसांकडे तक्रार केली आहे.

खरं तर आयटी कायद्याच्या कलम 66 (सी) अंतर्गत खार पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तीविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. याचा तपासही सुरू करण्यात आला आहे. या अज्ञात व्यक्तीबाबत सध्या कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र, विद्या बालनने तिच्या चाहत्यांना अशा बनावट अकाउंटपासून सावध राहण्यास सांगितले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vidya Balan (@balanvidya)

 

Vidya Balan चे बनावट अकाउंट

याआधीही अनेक स्टार्सच्या नावाने फेक अकाउंट तयार करण्यात आले आहेत. मागील काही दिवसांपासून विद्या बालन तिच्या आगामी ‘भूल भुलैया 3’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटातून मंजुलिकाने एन्ट्री केली आहे. अशा परिस्थितीत ती सर्वत्र ट्रेंड करत आहे.

आगामी चित्रपटामुळे विद्या बालन सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. याचाच फायदा घेत अज्ञात व्यक्तीने लोकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला. मात्र ही बाब वेळीच उघडकीस आली. आता पोलिसांकडून तपास सुरू आहे.

News Title- Bollywood actress Vidya Balan’s fake Instagram account has been created and she has lodged an FIR with the Mumbai Police
महत्त्वाच्या बातम्या –

विराट-अनुष्काच्या लेकाचे नाव ‘अकाय’, जाणून घ्या याचा अर्थ

राहुल गांधी यांचं ऐश्वर्या रायबद्दल विधान अन् चाहते संतापले!

दीपिका आणि रणवीर सिंह यांच्याबाबत महत्त्वाची माहिती समोर, लवकरच…

ऐश्वर्या आणि अभिषेकच्या लेकीची शाळेची फीस माहितीये का?; आकडा वाचून थक्क व्हाल

रोहित शर्माच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी!