भारतीय क्रिकेटमधील 2 दिग्गज ‘भाजप’त जाणार? लोकसभा लढण्याची शक्यता

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Yuvraj Singh | आगामी काळात लोकसभा निवडणूक होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत सांगितल्याप्रमाणे येत्या एक-दोन महिन्यात निवडणुकांच्या तारखांची घोषणा होईल. जसजशा निवडणुका जवळ येत आहेत तसतसे राजकारण तापू लागले आहे. सत्ताधारी भाजप आणि इंडिया आघाडीत आरोप प्रत्यारोपाच्या फैऱ्या सुरू आहेत. पंजाबमधील काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू पुन्हा एकदा भाजपमध्ये येऊ शकतात, अशी चर्चा रंगली आहे.

गेल्या काही दिवसांपासून सिद्धू यांचे काँग्रेससोबतचे संबंध ताणले गेले आहेत. पण अनेकदा त्यांनी काँग्रेसच्या हायकमांडचे फोटो पोस्ट करून चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. माहितीनुसार, सिद्धू यांच्या मनात पक्षात ते बाजूला झाल्याची भावना आहे. त्यांची भाजपशी चर्चा सुरू असल्याचे बोलले जात आहे. भाजप त्यांना लोकसभा निवडणुकीसाठी तिकीट देऊ शकते. गेल्या काही काळापासून भाजपविरोधात आक्रमक भूमिका घेणारे सिद्धू हे सध्या शांत आहेत. ते लवकरच भाजपमध्ये परतणार असल्याचे सांगितले जात आहे.

सिद्धू भाजपत जाणार असल्याची चर्चा

नवज्योतसिंग सिद्धू यांची गणना राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या जवळच्या व्यक्तींमध्ये केली जाते. पंजाबमधील विधानसभा निवडणुकीदरम्यान सिद्धू आणि काँग्रेस हायकमांडमधील संबंध बिघडले होते. राहुल आणि प्रियांका यांच्याशी जवळचे संबंध असूनही सिद्धू यांना पंजाब काँग्रेसची साथ मिळाली नाही.

तेव्हापासून सिद्धू काँग्रेस हायकमांडवर नाराज होते. सिद्धू भाजपच्या संपर्कात असून लोकसभा निवडणुकीबाबत लवकरच निर्णय घेतला जाऊ शकतो, याला भाजप नेत्यांनीही दुजोरा दिला आहे. भाजप सिद्धू यांना अमृतसरमधून पुन्हा एकदा निवडणुकीत उभे करू शकते.

Yuvraj Singh लोकसभा लढणार?

तसेच माजी क्रिकेटपटू युवराज सिंग भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या जोर धरत आहे. भाजप त्याला पंजाबमधील गुरुदासपूरमधून उमेदवारी देऊ शकते. सनी देओल गुरुदासपूरचा विद्यमान खासदार आहे. नुकतेच गुरुदासपूरमध्ये सनी देओल बेपत्ता झाल्याचे पोस्टर लावण्यात आले होते. संसदेतही त्याची उपस्थिती फारच कमी राहिली.

अनेक वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप गुरुदासपूरमधून नव्या चेहऱ्याच्या शोधात होती. युवराज सिंगच्या नावाची पक्षात जोरदार चर्चा आहे. याआधी भाजपने विनोद खन्ना यांनाही येथून उमेदवारी दिली आहे. या जागेवरून गेल्या अनेक वर्षांपासून केवळ सेलिब्रिटीच निवडणूक जिंकत आहेत.

News Title- Congress leader and former cricketer navjot singh sidhu likely to join BJP and Yuvraj Singh is also likely to contest the Lok Sabha elections
महत्त्वाच्या बातम्या –

विद्या बालनच्या अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची मुंबई पोलिसांत धाव, प्रकरण काय?

विराट-अनुष्काच्या लेकाचे नाव ‘अकाय’, जाणून घ्या याचा अर्थ

राहुल गांधी यांचं ऐश्वर्या रायबद्दल विधान अन् चाहते संतापले!

दीपिका आणि रणवीर सिंह यांच्याबाबत महत्त्वाची माहिती समोर, लवकरच…

ऐश्वर्या आणि अभिषेकच्या लेकीची शाळेची फीस माहितीये का?; आकडा वाचून थक्क व्हाल