राहुल गांधी यांचं ऐश्वर्या रायबद्दल विधान अन् चाहते संतापले!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Rahul Gandhi | काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी सध्या भारत जोडो न्याय यात्रा काढत आहेत. ते देशातील विविध शहरांना भेट देऊन तेथील नागरिकांशी संवाद साधत आहेत. पण, राहुल गांधी पुन्हा एकदा त्यांच्या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर ट्रोल होत आहेत. ते त्यांच्या विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतात. राहुल गांधी यांनी भारत जोडो न्याय यात्रेत ऐश्वर्या रायच्या डान्सशी संबंधित वक्तव्य केले अन् नेटकरी संतापले.

सोशल मीडियावर चाहते राहुल गांधींना ट्रोल करत आहे. राहुल गांधींनी ऐश्वर्या रायच्या डान्सशी संबंधित विधान करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी राहुल यांनी राम मंदिराच्या उद्घाटन कार्यक्रमासंदर्भात देखील ऐश्वर्या रायशी संबंधित वक्तव्य केले होते.

गांधींची भारत जोडो न्याय यात्रा

भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान राहुल गांधी वाराणसीमध्ये कार्यकर्त्यांना संबोधित करत होते. सर्व मीडिया हाऊसची नावे घेत राहुल गांधी यांनी विचारले की हे सर्व कोणाचे आहेत? तसेच ही मीडिया हाऊसेस… अदानी आणि अंबानी यांची आहेत. शेतकरी, शेतमजूर, गरीब यांच्याबद्दल ते कधीच काही दाखवणार नाहीत. कारण ते हे करूच शकत नाहीत, त्यांचा बॉस नकार देतो, असे त्यांनी सांगितले.

राहुल गांधी पुढे म्हणाले की, भारतातील मीडियात गरीब दिसणार नाहीत. मीडियाला काही दाखवायचे असेल तर त्यांना ऐश्वर्या रायला नाचताना दाखवावी लागते, नरेंद्र मोदींना 24 तास दाखवावे लागते. त्यांना अमिताभ बच्चन यांना दाखवायचे असते. राहुल यांनी देशभरातील माध्यमांवर यावेळी टीका केली.

Rahul Gandhi यांच्या विधानाने वाद

या विधानामुळे ऐश्वर्याच्या चाहत्यांनी राहुल गांधींना ट्रोल करण्यास सुरुवात केली. त्याचवेळी काही लोकांनी या प्रकरणी ऐश्वर्या रायच्या सासू जया बच्चन यांच्यावरही प्रश्न उपस्थित केले होते. अनेकांनी सांगितले की, जया बच्चन आपल्या सुनेबद्दलच्या अशा कमेंटवर मौन बाळगून आहेत.

राहुल गांधींचे हे विधान ऐश्वर्या रायच्या चाहत्यांना आणि सोशल मीडिया यूजर्संना डिवचणारे ठरले. त्यामुळे राहुल गांधींना सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. राहुल गांधींसोबतच महिलांबाबत आवाज उठवण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या ऐश्वर्या रायच्या सासू आणि राज्यसभा खासदार जया बच्चन यांनीही मौन पाळल्याबद्दल चाहत्यांनी टीका केली आहे.

News Title- Congress leader MP Rahul Gandhi has made a statement about Bollywood actress Aishwarya Rai during Bharat Jodo Nyaya Yatra
महत्त्वाच्या बातम्या –

दीपिका आणि रणवीर सिंह यांच्याबाबत महत्त्वाची माहिती समोर, लवकरच…

ऐश्वर्या आणि अभिषेकच्या लेकीची शाळेची फीस माहितीये का?; आकडा वाचून थक्क व्हाल

रोहित शर्माच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी!

‘मला वाटतंय, ऐश्वर्यांने आराध्याला कायमच…’; अभिषेक बच्चनचं लेकीबाबत मोठं वक्तव्य

‘ते म्हणतात की तुम्ही भा**** आहात’; भुजबळांनी विधानसभेत केली जरांगेंची तक्रार