‘ते म्हणतात की तुम्ही भा**** आहात’; भुजबळांनी विधानसभेत केली जरांगेंची तक्रार

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Manoj Jarange Patil | मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे अनेक दिवसांपासून सरकारकडे मराठा समाजाला कुणबी प्रवर्गामध्ये सामावून घेण्याबाबत मागणी करत आहे. काही दिवसांआधी सरकारने मनोज जरांगे पाटील यांना अध्यादेशही दिला. मात्र ओबीसी नेते छगन भुजबळ हे नाराज होते. त्यानंतर आता राज्य सरकारने राज्यामध्ये एकूण किती मराठा बांधव आहे. याचे सर्वेक्षण केलं आणि मराठा आरक्षणाचा विधेयक विधिमंडळामध्ये सादर केला. त्यावेळी सर्व नेते आणि मंत्री होते. यावेळी ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांची तक्रार केली आहे.

विधिमंडळामध्ये मराठा आरक्षणाचा सरकारने विधेयक सादर केलं. ओबीसी प्रवर्गातील आरक्षणाला धक्क न लावता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावं यासाठी सरकार काम करत आहे. यावेळी मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. मात्र हे आरक्षण कोर्टामध्ये टिकण्यावर शंका असल्याचं मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) म्हणाले. यापार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील हे शिव्या देत असल्याचा दावा केला आहे. ते धमकी देत असल्याची तक्रार भुजबळ यांनी केली.

गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे छगन भुजबळ यांना धमकी देत आहेत असा आरोप आता छगन भुजबळ यांनी केला आहे. मला धमकी येते, याला टपकवीन त्याला टपकवीन. मागे तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि कलेक्टर अधिकाऱ्यांना भाडखाऊ शिव्या दिल्या आहेत. अध्यक्ष महोदय ही जी दादागिरी सुरू आहे त्याला तुम्ही कंट्रोल करणार आहे की नाही, असा सवाल त्यांनी केलाय.

“मराठा समाजाला आमचा विरोध नाही”

मराठा समाजाला आमचा विरोध नाही. उलट आम्ही मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याबाबत आम्ही राज्य सरकारकडे मागणी केली होती. मात्र यावर मनोज जरांगे पाटील हे धमक्या देत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याखाली बसून त्यांनी अधिकारी, कलेक्टर यांना शिव्या दिल्या आहेत, असं भुजबळ म्हणाले होते.

आंदोलन सुरू असताना आपण जर काही बोललो तर लगेच धमकी येते. यांनी 27 तारखेला गुलाल उधळला, फटाके फोडले, 10 तारखेला पुन्हा उपोषण केलं असून राज्यातील गाड्या फोडल्या आहेत. यामुळे राज्यभरात भितीचे वातावरण आहे. अध्यक्ष महोदय हे थांबायला हवं असं छगन भुजबळ म्हणाले आहेत. त्यानंतर आजचा ठराव जरांगे यांना पास नसल्याचं भुजबळ म्हणाले आहेत.

काय म्हणाले राहुल नार्वेकर?

छगन भुजबळ यांनी सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे. यावर भुजबळ यांनी सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे? त्याची मी नोंद घेतली आहे. आपल्याला जिवीतहानीची संभावना वाटणे हे रास्त आहे. आपण चिंता व्यक्त केली आहे”, त्याची मी नोंद घेतली आहे, असं राहुल नार्वेकर म्हणालेत.

News update – Manoj Jarange patil vs chhagan Bhujbal news update

महत्त्वाच्या बातम्या

अन् रागाच्या भरात मनोज जरांगे यांनी सलाईन काढून फेकली, वाचा नेमकं काय घडलं?

“..तिथे तुम्हाला ऐश्वर्या राय नाचताना दिसेल”, ‘या’ नेत्याचं खळबळजनक वक्तव्य

पुण्यातील हॉटेल्स अन् पब मालकांना पोलीस आयुक्तांचा मोठा दणका!

राज्यातील निवासी डॉक्टरांचा मोठा निर्णय, सरकारला दिला शेवटचा इशारा

कल्याणमध्ये पुन्हा राडा; गणपत गायकवाड प्रकरणात मोठा ट्विस्ट