“..तिथे तुम्हाला ऐश्वर्या राय नाचताना दिसेल”, ‘या’ नेत्याचं खळबळजनक वक्तव्य

Rahul Gandhi on Aishwarya Rai

Aishwarya Rai | अभिनेत्री ऐश्वर्या रायचा चाहतावर्ग फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात दिसून येतो. गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चा होत आहेत. त्यामुळे ऐश्वर्या (Aishwarya Rai) सतत चर्चेत आहे. अशातच काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी ऐश्वर्या बद्दल धक्कादायक वक्तव्य केल्याने ती पुन्हा चर्चेत आली आहे.

बिहारमधून ‘भारत जोडो न्याय यात्रा’ उत्तर प्रदेशात दाखल झाल्यानंतर चंदौली जिल्ह्यातील एका जाहीर सभेला संबोधित करताना राहुल गांधींनी सामाजिक न्यायाचा मुद्दा उपस्थित करत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी राम मंदिर उद्घाटनावरून काही कलाकारांवरही निशाणा साधत टीका केली.

अभिनेत्री ऐश्वर्या राय या उद्घाटन सोहळ्याला सामील झाली नसतानाही तिच्यावर राहुल गांधी यांनी टीका केली. यावरून सोशल मीडियावर राहुल गांधी यांना टार्गेट केलं जात आहे. तसेच या वादावर ऐश्वर्याची सासू जया बच्चन यांनी मौन राहणंच पसंत केलं आहे. यावरूनही नेटकरी जया बच्चन यांना टार्गेट करत आहेत.

राहुल गांधी नेमकं काय म्हणाले?

तुम्ही राम मंदिरातील उद्घाटन सोहळा पाहिला का? तिथे एकही ओबीसी चेहरा होता काय?, अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय आणि नरेंद्र मोदी तिथे होते. देशाच्या एकूण लोकसंख्येच्या 73 टक्के लोक कार्यक्रमादरम्यान कुठेही दिसले नाहीत. कारण, भाजपला असं कधीही वाटलं नाही की, या लोकांनी देशाच्या महत्वाच्या प्रसंगी उपस्थित असावं.

नरेंद्र मोदी आज देशाला दोन भागांमध्ये वाटत आहेत. एकीकडे गरीबी तर दुसरीकडे काही लोक आलिशान विमानात प्रवास करत आहेत. गरिबांसाठी मजदूरी हाच मार्ग आज उरला आहे. मात्र, काही लोक देशातील रेल्वे, विमानतळ, जमीन काय-काय खरेदी करत आहेत. दोन भारत बनत आहे. एकीकडे ऐश्वर्या (Aishwarya Rai) नाचताना दिसेल तर दुसरीकडे अमिताभ बच्चन बल्ले बल्ले करत बाहेर येतील. शाहरुख खान, विराट कोहली हे सगळे दिसतील. पण, एक गरीब दिसणार नाही, असं वक्तव्य राहुल गांधी यांनी सभेत केलं.

यावरून आता राहुल गांधी यांच्यावर टीका होत आहे. सोशल मीडियावर याबाबत अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. एका ट्विटर युजरने म्हटलं की, राहुल गांधी बिग-बी यांनी राम मंदिर प्राणप्रतिष्ठेला हजेरी लावल्यानंतर ऐश्वर्या रायचा सतत “नाचणारी” असा उल्लेख करत आहे. मात्र यावर फेमिनिस्ट महिला शांत आहेत. जया बच्चन यांनीही यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही.”

News title – Rahul Gandhi controversial statement about Aishwarya Rai

 महत्वाच्या बातम्या- 

कल्याणमध्ये पुन्हा राडा; गणपत गायकवाड प्रकरणात मोठा ट्विस्ट

‘या’ राशींवर राहील गणेश कृपा; पाहा आजचं राशीभविष्य

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी!

ग्राहकांना मोठा धक्का! सोनं महागलं, जाणून घ्या दर

मराठा आरक्षण विधेयक मंजूर होताच जरांगेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .