मराठा आरक्षण विधेयक मंजूर होताच जरांगेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Manoj Jarange Patil | गेल्या काही दिवसांपासून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला ओबीसीमध्ये सामावून घेण्यासाठी सरकारकडे मागणी करत आहे. मात्र याला ओबीसी नेत्यांचा विरोध आहे. मराठा समाजाच्या कुणबी म्हणजेच ओबीसी प्रवर्गातील नोंदी सापडल्या आहेत. यावर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी ओबीसीतूनच आरक्षण द्या, अशी राज्य सरकारकडे मागणी केली आहे.

ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण न देता वेगळं आरक्षण द्यावं, अशी धारणा ओबीसी बांधवांची आहे. म्हणून आता राज्य सरकारने गेल्या काही दिवसांपासून राज्यातील मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाचे सर्वेक्षण केलं आहे. ते सर्वेक्षण गेल्या काही दिवसांआधीच झालं म्हणून सराकारने आज मराठा समाजाचा मसुदा विधिमंडळामध्ये सादर केला जाणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही माहिती दिली आहे. (Manoj Jarange Patil)

मराठा समाजाचे सर्वेक्षण केल्यानंतर राज्यामध्ये 27 टक्के मराठा समाज असल्याची माहिती समोर आली आहे. तर या समाजाला आता 10 टक्के आरक्षण देण्यात येणार असल्याची माहिती आहे. राज्य मागासवर्गाच्या आयोगामध्ये ही माहिती नमूद करण्यात आली आहे. मात्र यावर आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी विरोध दर्शवला आहे.

आम्हाला 10 टक्के आरक्षण नको. आम्हाला ओबीसीमधलं आरक्षण पाहिजे नाहीतर कडकडीत आंदोलनाचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. सगेसोयरेबाबतीत सरकारने अंमलबजावणी करावी. 10 टक्के आरक्षण हे मराठा समाजाचं नुकसान करणारं आहे. या आरक्षणाचा मराठा समाजाला काहीही उपयोग होणार नाही, असं जरांगे पाटील म्हणाले.

काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?

“सगेसोयरे शब्दांची अंमलबजावणी करावी अशी मागणी आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण पाहिजे. त्याकडे तुम्ही दुर्लक्ष करता आणि वेगळ्याच गोष्टी समोर आणता. सगेसोयरे शब्दाची अंमलबजावणी झाली पाहिजे नाहीतर आम्ही पुन्हा आंदोलन करू,” असं मनोज जरांगे पाटील म्हणतात.

“पुढचं आंदोलन बघू”

“सरकारने सगळी प्रक्रिया केली आहे खरं आहे पण, ओपन कोर्टामध्ये सुनावणी केली जाईल का? सुनावणी झाली तरीही नुकसान नाही झालं तरीही नुकसान. त्यापेक्षा नोंदी सापडल्या आहेत. तर देऊन टाका आरक्षण त्यांना काय टेन्शन आहे. समाज डोक्यावर घेऊन नाचेल. नाहीतर पुढचं आंदोलन बघू उद्या. राज्यातील एखादा नागरिक उपोषण करू नाहीतर आत्महत्या करून मरो त्यांना घेणदेणं नाही. एवढी जर मग्रुरी आहे तर आम्ही मराठा आहे, रस्त्यावर उतरवायला वेळ लागणार नाही”, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.

News Title – Manoj Jarange Patil News Update On Maratha reservation

महत्वाच्या बातम्या

‘या’ महिला पुरूषांसाठी असतात लकी; आयुष्यभर राहाल सुखी

मोठी बातमी! प्रसिद्ध अभिनेते ऋतुराज सिंह यांचं निधन

शरद पवार गटाला मोठा धक्का, ‘हा’ बडा नेता भाजपच्या वाटेवर?

सर्वांत मोठी बातमी ! मराठा समाजाला ‘इतके’ टक्के आरक्षण मिळणार

विशेष अधिवेशनापुर्वीच मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला गंभीर इशारा!