केकेआरमध्ये नव्या खेळाडूची एंट्री; ‘या’ वेगवान गोलंदाजाला दिली संधी

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

IPL 2024 | आयपीएल 2024 (IPL 2024) सुरू होण्याआधी चर्चेत आली आहे. यंदाच्या आयपीएलने अनेक वळणं घेतली आहेत. रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्स संघाच्या कर्णधारपदावरून यंदा आयपीएलने चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. आगामी लोकसभेच्या निवडणुकीमुळे आयपीएलच्या तारखेबाबत अजून संभ्रम निर्माण झाला आहे. अशातच आता आयपीएलमध्ये आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. केकेआरमधील एका खेळाडूऐवजी श्रीलंकेच्या वेगवान गोलंदाजाला संधी देण्यात आली आहे. (IPL 2024)

दुशमंथा चमीरा केकेआरमध्ये खेळणार

केकेआरच्या गस एटकिंन्सन खेळाडूऐवजी आता श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज दुशमंथा चमीराला संधी देण्यात आली आहे. यामुळे केकेआर संघाच्या गोलंदाजीची बाजू आणखी भक्कम झाली आहे. काही दिवसांआधी आगामी आयपीएलचा लिलाव झाला आहे. या लिलावामध्ये दुशमंथाला बेस प्राइज केवळ 50 लाखांमध्ये घेतलं आहे. मात्र हा गोलंदाज विरोधकांवर भारी पडणार आहे. (IPL 2024)

लिलावामध्ये केकेआरचा मेटॉर गौतम गंभीरने मिचेल स्टार्कवर रेकॉर्डब्रेक बोली लावली आहे. यामुळे केकेआर संघ भक्कम परिस्थितीत पाहायला मिळणार आहे. दुशमंथा हा 2022 च्या आयपीएलमध्ये दिसला होता. त्यानंतर तो आता यंदाच्या आयपीएल 2024 मध्ये केकेआरमध्ये दिसणार आहे.

दुशमंथा चमीराबाबत थोडक्यात

आयपीएल 2022 मध्ये दुशमंथा चमीराने 12 सामने खेळत 9 विकेट्स घेतल्या. चमीराला केकेआरमध्ये संधी दिल्यानंतर संघाने याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. ” केकेआरने दुशमंथा चमीराला गट एटकिंन्सनऐवजी संघामध्ये सामिल केलं आहे.”

2018 आणि 2021 मध्ये वेगवान गोलंदाज दुशमंथा हा राजस्थान रॉयल्समधून खेळत होता. तर त्यानंतर म्हणजेच 2022 मध्ये तो लखनौ सुपर जायंट्स संघातून खेळत होता. आता तो केकेआरमधून खेळणार आहे. वेगवान गोलंदाजीसह तो चेंडू स्विंग देखील करतो.

यंदाची आयपीएल सुरू होण्याआधीच चर्चेत आली आहे. या आयपीएलने अनेक वळणं घेतली आहेत. मात्र अजूनही आयपीएल 2024 च्या तारखेबाबत अजूनही कोणतीही अपडेट समोर आली नाही.

News Title – IPL 2024 news Update

महत्त्वाच्या बातम्या

क्रिकेटपटू Ravichandran Ashwin च्या पत्नीचा मोठा खुलासा! म्हणाली..

रणबीर कपूरचा ऐश्वर्या रायबद्दल धक्कादायक खुलासा, म्हणाला…

राज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्यात चर्चा, राजकीय वर्तळात चर्चांना उधाण

शिवनेरी किल्ल्यावरून मुख्यमंत्र्यांचं मराठा आरक्षणाबाबत मोठं वक्तव्य!

शिवजयंतीदिवशी अभिनेता रितेश देशमुखची सर्वांत मोठी घोषणा!