Raj Thackeray Ashish shelar | आगामी लोकसभा निवडणूक तोंडावर आल्या आहेत. याचपार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणामध्ये नवनवीन ट्वीस्ट घडताना दिसत आहेत. अनेक वर्षांपासून काम करत असणारे नेते मंडळी आपल्या पक्षाला राम राम ठोकताना भाजपमध्ये प्रवेश करत आहेत तर कोणी आपल्याच पक्षावर दावा ठोकत आहे. 2024 च्या आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक राजकीय धक्के खावे लागतील, अशी माहिती आता दिली आहे. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि आशिष शेलार (Raj Thackeray Ashish shelar) यांच्यामध्ये भेट झाली असल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. आशिष शेलार हे राज ठाकरे यांच्या बंगल्यावर भेटीसाठी गेले होते त्यांच्यामध्ये तासभर चर्चा झाली.
आशिष शेलार-राज ठाकरे एकत्र
राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून चर्चा होताना दिसत आहेत. यामुळे राज ठाकरे हे भाजपसोबत जाणार का? असा सवाल राजकीय वर्तुळामध्ये होत आहे. आता तर भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray Ashish shelar) यांची आज भेट झाल्याचं समजतंय. यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीला एक वेगळा रंग निर्माण होणार आहे.
एका बाजूला मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान अद्यापही मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवर प्रश्नचिन्ह आहे. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक कधी होईल? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यामुळे उद्धव ठाकरेंचा पराभव करण्यासाठी आता भाजपसोबत मनसे युती करणार का?, असा सवाल उपस्थित होतोय. यावर आता प्रवीण दरेकर यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. (Raj Thackeray Ashish shelar)
काय म्हणाले प्रवीण दरेकर?
राज ठाकरे यांचे मुंबईमध्ये अधिक मराठी मतदार आहेत. तर उद्धव ठाकरे यांचे अधिक मराठी मतदार आहेत यामुळे मुंबई मिळवण्याच्या दृष्टीने राज ठाकरे आणि आशिष शेलार एकत्र आल्याच्या चर्चा आहेत. तसेच प्रवीण दरेकर यांनी “राज ठाकरे जर आमच्यासोबत येणार असतील तर चांगलं असेल. एका विचारधारेची लोकं एकत्र येणार असेल तर ते चांगलं आहे. भारतीय जनता पार्टीचं नेहमीच बेरजेचं राजकारण राहिलेलं आहे. समाजासाठी काम करणं या भूमिकेला प्राधान्य देताना दिसत आहे”, असं प्रवीण दरेकर म्हणाले आहेत.
“इतर पक्षीय चौकटीच्या बाहेर जात आणखी चांगले नेते, आणखी चांगले पक्ष महायुतीत आपल्याशी जोडले गेले, तर त्या माध्यमातून लोकांसाठी काम करता येईल, अशी व्यापक भूमिका भाजपची आहे”, असं प्रवीण दरेकर म्हणाले आहेत.
मुंबई मिळवण्यासाठी मनसे-भाजप एकत्र येणार?
काही दिवसांपासून राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची अनेकदा भेट देखील झाली आहे. यानंतर आशिष शेलार आणि राज ठाकरे एकत्र आले आहेत. तर काही दिवसांआधी मनसे नेते बाळा नांदगांवकर हे सागर बंगल्यावर गेले होते. यामुळे भाजपने जर राज ठाकरे यांना सोबत घेतलं तर मुंबईवर मताधिक्याने सत्ता स्थापन होऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
News Title – Raj Thackeray Ashish shelar news update
महत्त्वाच्या बातम्या
शरद पवारांना बसणार आणखी एक मोठा धक्का!
आयेशा टाकियाने सोडलं मौन, ट्रॉलर्सला दिलं सडेतोड उत्तर; म्हणाली…
अमिताभ बच्चन यांचा सर्वांत मोठा खुलासा; म्हणाले, “15 तास स्वतःला खोलीमध्ये..”
आयपीएल सुरू होण्याआधीच CSK ला मोठा धक्का, ‘हा’ खेळाडू गंभीर जखमी