आयेशा टाकियाने सोडलं मौन, ट्रॉलर्सला दिलं सडेतोड उत्तर; म्हणाली…

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ayesha Takia | अभिनेत्री आयेशा टाकियाने (Ayesha Takia) गेल्या अनेक वर्षांपासून फिल्म इंडस्ट्रीतून ब्रेक घेतला आहे. एकेकाळी ती प्रचंड लोकप्रिय अभिनेत्री होती. आपल्या सौंदर्याने तिने अनेकांना घायाळ केलं आहे. नुकतीच ती मुंबई एअरपोर्टवर दिसून आली होती. यावेळी पापाराझींनी तिचे फोटो आणि व्हिडीओ क्लिक करून सोशल मीडियावर अपलोड केले.

आयेशाचा लूक आता पूर्णपणे बदलला आहे. सोशल मिडियावर तिला दिसण्यावरून बरेच ट्रोल केलं गेलं. आता या ट्रोलर्सना तिने सडेतोड उत्तर दिलं आहे. तसेच बॉलिवूडमध्ये कमबॅक करण्याबाबतही तिने सांगितलं आहे.

काय म्हणाली आयेशा टाकिया?

ट्रोलिंगनंतर आयेशाने (Ayesha Takia) सोशल मिडीयावर एक पोस्ट करत सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. या पोस्टमध्ये तिने सर्वांत आधी एअरपोर्टवर जाण्याचं कारण सांगितलं. ‘हे सांगणं भाग आहे. दोन दिवसांपूर्वी मी गोव्याला गेले होते. माझ्या कुटुंबात मेडिकल इमर्जन्सी होती. माझी बहीण रुग्णालयात दाखल होती, असं असतानाही पापाराझींनी मला एअरपोर्टवर थांबवलं होतं. त्यांनी माझे काही फोटो आणि व्हिडीओ क्लिक केले होते’, असं तिने लिहिलं आहे.

पुढे आयेशाने दिसण्यावरून केल्या गेलेल्या टीकेवरही भाष्य केलं आहे. मला समजलंय की या देशात माझ्या दिसण्यावरून आणि चेहऱ्यावरून चर्चा करण्यापेक्षा दुसरा कोणता मुद्दाच उरलेला नाही. माझे फोटो आणि व्हिडीओ खूप व्हायरल करण्यात आले. त्यावर लोकांनी अत्यंत वाईट प्रतिक्रिया दिल्या. त्यांनी माझ्या दिसण्यावरून अत्यंत वाईट कमेंट्स केल्या, असं आयेशा म्हणाली आहे.

आयेशा टाकिया कमबॅक करणार?

खरं सांगायचं झालं तर मला कोणत्याच चित्रपटामध्ये किंवा मोठ्या पडद्यावर कमबॅक करण्यात काहीच रस नाही. मी माझं आयुष्य आनंदाने जगतेय आणि मला कधीच प्रकाशझोतात यायचं नाहीये. मला कोणत्याच प्रसिद्धीची हौस नाही आणि मला कोणत्याच चित्रपटात काम करायचं नाहीये. त्यामुळे शांत राहा. मोकळे राहा, माझ्याविषयी चिंता करणं सोडून द्या, असे म्हणत आयेशाने (Ayesha Takia) कमबॅकच्या चर्चेवर पाणी फेरलं आहे. तिची ही पोस्ट आता चांगलीच व्हायरल होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by 🧿Ayesha Takia Azmi (@ayeshatakia)

“चांगली दिसणारी महिला शोधण्यापेक्षा..”

‘एक मुलगी किंवा महिला असल्याने लोकांची अपेक्षा असते की ती जशी किशोरवयात दिसत होती, तशीच ती 15 वर्षांनंतरही दिसावी. पण हे किती अवास्तविक आणि हास्यास्पद आहे. तुमच्याकडे असलेल्या मोकळ्या वेळेत चांगली दिसणारी महिला शोधण्यापेक्षा काहीतरी चांगलं काम करा. मला खूप चांगलं आयुष्य मिळालं आहे आणि मला तुमच्या सल्ल्याची गरज नाही. ज्या लोकांना त्याची गरज असेल, त्यांच्यासाठी ते वाचवून ठेवा. मी तुम्हाला तुमचीच वाईट ऊर्जा परत करतेय. आयुष्यात काहीतरी चांगलं करा, छंद बाळगा, मित्रमैत्रिणींशी गप्पा मारा, हसा आणि ते सर्व करा ज्यामुळे तुम्हाला दुसऱ्या आनंदी महिलेला तुम्हाला अपेक्षित असं दिसत नसल्याबद्दल कमेंट करायची गरज भासणार नाही.’,असा टोलाही आयेशाने (Ayesha Takia) ट्रॉलर्सला लगावला आहे.

News Title- Ayesha Takia scathing reply to the trollers

महत्त्वाच्या बातम्या –

टाटा समूहाला ‘देव’ पावणार? वैष्णोदेवी ते अयोध्येपर्यंत कमाईची ‘भारी’ योजना

OUT अन् 20 मिनिटांनी NOT OUT; रहाणेसोबत काय घडलं? प्रथमच झालं असं, कोचनं मागितली माफी

शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यावरून वाद; मोठा पोलीस बंदोबस्त, गावाचे छावणीत रूपांतर

…म्हणून शोएब सानियापासून वेगळा झाला; पतीला चीअर करताना सना, चाहत्यांनी घेतली फिरकी

सावधान! ‘या’ अशा महिलांपासून ‘दूरी है जरूरी’, कारण चाणक्य म्हणतात…