OUT अन् 20 मिनिटांनी NOT OUT; रहाणेसोबत काय घडलं? प्रथमच झालं असं, कोचनं मागितली माफी

Ajinkya Rahane

Ajinkya Rahane | मराठमोळा क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे सध्या भारतीय संघापासून दूर आहे. रहाणे रणजी ट्रॉफीमध्ये खेळत असून आसामविरूद्धच्या सामन्यात मुंबईच्या संघाने चमकदार कामगिरी केली. आसामविरुद्धच्या साखळी सामन्यात मुंबईच्या डावादरम्यान मैदानात एक अनोखी घटना घडली. क्षेत्ररक्षणात अडथळा आणल्याबद्दल फलंदाज अजिंक्य रहाणेला बाद घोषित करण्यात आले. ही घटना टी ब्रेकच्या एक षटक आधी घडली. तेव्हा रहाणे 18 धावा करून फलंदाजी करत होता.

पंचांनी बाद घोषित केल्यानंतर रहाणेने पॅव्हेलियनचा रस्ता धरला. खरं तर झाले असे की, आसामचा वेगवान गोलंदाज दिबाकर जोहरीच्या चेंडूवर रहाणेने मिड-ऑनच्या दिशेने फटका मारला आणि तो धाव घेण्यासाठी धावला. मात्र, नॉन स्ट्रायकरला असलेल्या शिवम दुबेने धाव घेण्यास नकार दिल्याने रहाणेला माघारी परतावे लागले.

रहाणेसोबत काय घडलं?

तितक्यात आसामचा कर्णधार दानिश दासने यष्टीरक्षकाच्या दिशेने चेंडू फेकला, जो क्रिझवर परतण्याचा प्रयत्न करत असलेल्या रहाणेला लागला. चेंडूच्या वाटेत रहाणेचा अडथळा आल्याने चेंडू यष्टीरक्षकाकडे पोहोचू शकला नाही. त्यानंतर आसामच्या क्षेत्ररक्षकांनी राहणेला बाद घोषित करण्यासाठी अपील केली. मग पंचांनी देखील याला प्रतिसाद देत रहाणेला बाहेर जाण्याचा इशारा केला.

आसामच्या खेळाडूंनी मैदानात अडथळा आणल्याबद्दल अपील केली आणि पंचांनी रहाणेला बाद घोषित केले. पंचांनी 25 व्या षटकाचे 2 चेंडू शिल्लक असताना टी ब्रेक घोषित केला. मात्र, चहापानाच्या वेळी आसामच्या संघाने आपली अपील मागे घेतली. नियमांनुसार, पुढचा चेंडू टाकण्यापूर्वी अपील मागे घ्यावी लागते आणि जर पंचांनी ते मान्य केले तर फलंदाजाला पुन्हा खेळण्याची संधी मिळते.

Ajinkya Rahane ला जीवनदान

मुंबईचा अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूरने नंतर ‘ईएसपीएनक्रिकइन्फो’ला सांगितले की, रहाणेची पुन्हा फलंदाजी करण्याची इच्छा नव्हती. कारण अपील करून प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंनी त्यांची नैतिकता दाखवली होती. एकूणच शार्दुलने आसामच्या खेळाडूंवर नाराजी व्यक्त केली.

शार्दुल म्हणाला की, आम्ही ड्रेसिंग रूममध्ये व्हिडीओमध्ये पाहिले की, रहाणे वळला आणि तो सरळ रेषेत धावत होता. त्याने चेंडूकडेही लक्ष दिले नाही. आसामचे प्रशिक्षक ट्रेव्हर गोन्साल्विस हे टी ब्रेकदरम्यान अपीलबद्दल ‘माफी मागण्यासाठी’ मुंबईच्या ड्रेसिंग रूममध्ये आले होते. गोन्साल्विस यांच्या सांगण्यानंतर आसामच्या खेळाडूंनी अपील मागे घेतली अन् रहाणेला पुन्हा फलंदाजीची संधी मिळाली.

News Title- Ajinkya Rahane called back by Assam after being given out in ranji trophy 2024, read here details
महत्त्वाच्या बातम्या –

शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यावरून वाद; मोठा पोलीस बंदोबस्त, गावाचे छावणीत रूपांतर

…म्हणून शोएब सानियापासून वेगळा झाला; पतीला चीअर करताना सना, चाहत्यांनी घेतली फिरकी

सावधान! ‘या’ अशा महिलांपासून ‘दूरी है जरूरी’, कारण चाणक्य म्हणतात…

अखेर विराट कोहलीच्या अनुपस्थितीचं कारण आलं समोर; ‘विरुष्का’बद्दल मोठी अपडेट

दीपिका पादुकोणने पुन्हा वाढवली भारताची शान; लंडनमधील प्रतिष्ठित पुरस्कार सोहळा गाजवला

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .