दीपिका पादुकोणने पुन्हा वाढवली भारताची शान; लंडनमधील प्रतिष्ठित पुरस्कार सोहळा गाजवला

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Deepika Padukone | बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण BAFTA Awards 2024 मध्ये प्रेझेंटर म्हणून सहभागी झाली. हा अवॉर्ड शो लंडनमधील वेळेनुसार काल संध्याकाळी 7 वाजता आणि भारतीय वेळेनुसार सोमवारी रात्री 12.30 वाजता सुरू झाला. हळुहळू रेड कार्पेटचे लुक्स एक एक करून समोर येत आहेत. अशातच आता दीपिका पादुकोणचा लूकही समोर आला आहे. 18 फेब्रुवारीची संध्याकाळ लंडनमध्ये तारांकित झाली. BAFTA Awards 2024 सोहळा लंडनमध्ये पार पडला.

अभिनेत्री दीपिका पादुकोणने तिच्या इंस्टाग्रामवर बाफ्टा अवॉर्ड शोसाठी परिधान केलेल्या खास पेहरावचे काही फोटो शेअर केले आहेत, या फोटोंमध्ये दीपिका खूपच सुंदर दिसत आहे. यावेळीही अभिनेत्रीने तिच्या रेड कार्पेटसाठी तिचा देसी लूक निवडला. पहिल्या फोटोमध्ये दीपिका भारी पोज देताना दिसली. तर दुसऱ्या फोटोत ती क्लोज-अप शॉट देताना दिसली.

BAFTA Awards 2024 सोहळा

फोटोमध्ये अभिनेत्रीने चमकदार व्हाइट साडी परिधान केली आहे. यासोबत अभिनेत्रीने मॅचिंग स्लीव्हलेस ब्लाउज कॅरी केला आहे. दीपिका पादुकोणने तिच्या केसांचा अंबाडा बनवून सर्वांचे लक्ष वेधले. अभिनेत्रीचा हलका मेकअप तिच्या सुंदर सौंदर्यात भर घालत आहे. फोटो शेअर केल्यानंतर दीपिका पादुकोण अवॉर्ड शोच्या रेड कार्पेटवर पोहोचली. जिथे तिने मीडियासमोर जोरदार पोज दिली.

 

BAFTA Awards 2024 सोहळा भारतीय वेळेनुसार 19 फेब्रुवारी रोजी रात्री लंडनमधील रॉयल फेस्टिव्हल हॉलमध्ये पार पडला. दीपिका पादुकोण प्रेझेंटर म्हणून सहभागी झाली होती. यादरम्यान, अभिनेत्रीने स्टेजवर ‘द झोन ऑफ इंटरेस्ट’साठी नॉट इन द इंग्लिश लँग्वेज अवॉर्डची घोषणा केली. दीपिका पादुकोण ही त्या बॉलिवूड अभिनेत्रींपैकी एक आहे, ज्यांनी केवळ देशातच नाही तर जगभरात नाव कमावले आहे.

Deepika Padukone ने जिंकली मनं

दीपिकाने अनेक वेळा परदेशात भारताची प्रतिष्ठा उंचावली आहे. आता पुन्हा एकदा तिने परदेशी भूमीवर भारताची शान वाढवली आहे. डेव्हिड बेकहॅम, डुआ लिपा, ह्यू ग्रांट, चिवेटेल इजिओफोर, इद्रिस एल्बा, गिलियन अँडरसन, अँड्र्यू स्कॉट आणि बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण यांच्या नावांचा या अवॉर्ड शोच्या प्रेझेंटरच्या यादीत समावेश होता.

 

दरम्यान, एका बॉलिवूड अभिनेत्रीला लंडनमधील प्रतिष्ठित पुरस्कार सोहळ्यात प्रेझेंटर म्हणून मान मिळणे ही गौरवाची बाब आहे. यापूर्वी डिसेंबर 2023 मध्ये दीपिका ‘अकादमी म्युझियम गाला’मध्ये सहभागी होणारी पहिली भारतीय अभिनेत्री ठरली होती. 2023 च्या सुरुवातीला झालेल्या 95 व्या ऑस्कर सोहळ्यात देखील दीपिकावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली होती. ऑस्करच्या मंचावर ती प्रेझेंटर म्हणून दिसली. दीपिका कान फिल्म फेस्टिव्हलच्या ज्युरी सदस्यांच्या यादीत सामील झाली आहे. याशिवाय फिफा वर्ल्ड कप ट्रॉफीवरील पडदा उचलणारी ती पहिली भारतीय ठरली.

News Title- Indian actress Deepika Padukone spotted as a presenter at the prestigious BAFTA Awards 2024 in London, see photos
महत्त्वाच्या बातम्या –

पुरुषांमध्ये ‘हे’ 3 गुण असतील तर महिला होतात आकर्षित, चाणक्यांनी ठेवलंय लिहून

मोठी बातमी! कांदा निर्यातीबाबत केंद्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय

iPhone वापरणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी!

‘नरेंद्र मोदींना पुन्हा निवडून द्यायचं आहे, त्यामुळे…’; अजित पवारांचं मोठं वक्तव्य

‘या’ लोकांना हार्ट अटॅकचा सर्वात जास्त धोका, बातमी वाचून झोप उडेल