‘नरेंद्र मोदींना पुन्हा निवडून द्यायचं आहे, त्यामुळे…’; अजित पवारांचं मोठं वक्तव्य

Ajit Pawar | आगामी लोकसभा निवडणूक जवळ येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली असून चिन्ह आणि पक्ष हे अजित पवार (Ajit Pawar) यांना मिळालं आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या या निर्णयावर संतापाची लाट शरद पवार गटात उमटत आहे. काक विरूद्ध पुतण्या असा राजकीय खेळ रंगणार असं म्हटलं तरीही  वावगं ठरणार नाही. याचपार्श्वभूमीवर अजित पवार हे रायगड येथे दौऱ्यावर गेले असताना रायगडकरांनी त्यांचा चांगला पाहुणचार केला आहे.

अजित पवार (Ajit Pawar) हे पहाटे सकाळी रायगडच्या दौऱ्यावर गेले होते. याठिकाणी त्यांनी कार्यकर्त्यांची चांगलीच क्लास घेतली आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलत असताना त्यांनी मतदारांना विश्वासात घेण्याचा प्रयत्न करण्याबाबत कार्यकर्त्यांना सांगितलं आहे. यावेळी ते बोलताना त्यांनी रायगडकरांनी केलेल्या पाहुणचाराचा देखील उल्लेख केला आहे. इथली लोकं चांगली आहेत. पाहुणचार चांगला झाला बोंबील, सुरमई, बांगडा चव चांगली होती. त्यांनी रायगडकरांच्या पाहुणचाराचं कौतुक केलं.

असं खेळीमेळीचं वातावरण राहु द्या. सर्वांनी एकत्र काम करा. सध्या राजकीय घडामोडी घडत आहेत. ‘घड्याळ तेच वेळ नवी’, असं स्लोगन आपल्या पक्षाचं आहे. सध्या आपण महायुतीत आहे आणि आपण एनडीएमधून निवडणूक लढवायची आहे, असं अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले आहेत.

“पुन्हा एकदा मोदींना निवडूण द्यायचं”

महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप, आरपीआय आणि इतर पक्ष आहेत. त्यामुळे येत्या निवडणुकीमध्ये अधिकृत उमेदवाराला मतदान कारा. कारण जेवढे अधिक खासदार निवडूण येणार आहेत. त्यामुळे नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान होतील, असं अजित पवारांना म्हटलंय.

“नमो रोजगार मेळावा भरवणार”

विरोधी पक्षात राहून लोकांचे प्रश्न सुटत नाहीत. त्यासाठी सरकारमध्ये राहावं लागतं तेव्हाच प्रश्न सोडवता येतात. मार्ग काढून निधी देता येतात आणि विकास कामं करता येतात. आम्हाला महाराष्ट्राचा विकास करायचा आहे. मंत्रालयामध्ये आदिती तटकरे मंत्रालयामध्ये विविध कामांसाठी पाठपुरावा करतात. मेडिकल कॉलेजच्या माध्यमातून हजारो कोटींची गुंतवणूक करता येणार आहे. सहा मोठे मेळावे घेत नमो रोजगार देखील भरवण्यात येणार आहे, असं अजित पवार म्हणाले आहेत.

कोणीही गाफिल राहू नका. आता तुमच्यावरती जबाबदारी आहे. सगळे एकत्र येत होम ग्राऊंड सांभाळण्याचे काम करा. कोणीही काहीही वक्तव्य केलं तर देवेंद्र फडणवीस, रवींद्र चव्हाण आणि चंद्रशेखर बावनकुळे बघून घेतील असं म्हणत अजित पवार यांनी कार्यकर्त्यांची शाळा घेतली.

News Title – Ajit Pawar At Raigad for maharashtra assembly election

महत्त्वाच्या बातम्या

नांदेड सिटीत भव्य शिवजन्मोत्सव सोहळा; ढोल-ताशे, लेझीम, उंट-घोड्यांसह भव्य मिरवणूक

मराठा आरक्षणाबाबत सर्वात मोठी बातमी समोर!

चॉकलेटच्या किंमतीत मिळणाऱ्या शेअरचा बाजारात धुमाकूळ; गुंतवणूकदार मालामाल

टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज!

‘…म्हणून मी शिवसेना सोडली?’; मुख्यमंत्र्यांनी सांगितलं खरं कारण