‘…म्हणून मी शिवसेना सोडली?’; मुख्यमंत्र्यांनी सांगितलं खरं कारण

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Eknath Shinde | शिवसेनेमध्ये सध्या दोन गट पडले आहेत. निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे एकनाथ शिंदे यांचं असल्याचा निकाल जाहीर केला. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसची देखील तीच परिस्थिती पाहायला मिळते. या सर्व प्रकरणामागे देखील काहीन् काही कारण असल्याचं बोललं जात आहे. उद्धव ठाकरे यांना सोडण्याचं कारण आता स्वत: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सांगितलं आहे. त्यांनी कोल्हापूर येथे अधिवेशनात बोलत स्पष्टोक्ती दिली आहे.

एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतरचे पहिलेच महाअधिवेशन कोल्हापूर येथे सुरू आहे. या अधिवेशनामध्ये त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीकेचे बाण सोडले आहेत. याच प्रकरणाचा मागोवा घेत एकनाथ शिंदे यांनी 40 आमदार सोबत घेत बंड करत पक्षावर दावा सांगितला. यावेळी बोलत असताना त्यांनी उद्धव ठाकरे गटावर टीका केली आहे. महाविकास आघाडीमध्ये असताना बाळासाहेब ठाकरे यांचे विचार मरू लागले होते. शिवसैनिकांचे खच्चिकरण होऊ लागले होते. म्हणून आम्ही हे पाऊल उचललं असल्याचं एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले आहेत. जर आमचे पाऊल चुकले असते तर महायुतीला ग्रामपंचायतीत जनतेनं पहिल्या क्रमांकाचा पक्ष केला नसता.

“बाळासाहेबांनी नरेंद्र मोदींचं कौतुक केलं असतं”

यावेळी बोलत असताना ते म्हणाले की, “आज बाळासाहेब ठाकरे असते तर नरेंद्र मोदींचं त्यांनी कौतुक केलं असतं. कारण नरेंद्र मोदी यांनी कलम 370 हटवलं आणि राम मंदिर बांधलं”, असं शिंदे म्हणाले. “वारसदार सांगता त्यांनी एकही शब्द उच्चारला नाही. तुमच्याकडे हिंदुत्व सांगण्याची नैतिकता नाही. तुमच्याकडे जो असतो तो चांगला असतो. जो निघून जातो तो कचरा होतो. तो गद्दार होतो. एकेदिवशी महाराष्ट्र हा तुम्हाला कचरा केल्याशिवाय राहणार नाही”, असं म्हणत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

“आम्ही रात्री अपरात्री गेलो तर लोक स्वागतासाठी येतात. काम आणि वागण्यातून लोकांनी प्रेम दिलं. आम्ही चुकीचे केलं असतं तर लोकांनी आम्हाला प्रेम दिलं नसतं. बाळासाहेबांनी सांगितलं होतं की जर काँग्रेससोबत गेलो तर मी माझं दुकान बंद करेल. मग आज तुम्ही काँग्रेससोबत आहात. तुमचे हिंदुत्व कुठे? सावरकरांचा अपमान केला होता तेव्हा कुठे तुमचं हिंदुत्व?”, असा सवाल आता एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

लवकरच आयोध्यावारी

कोल्हापूरच्या अधिवेशनामध्ये बोलत असताना त्यांनी लवकरच राज्यातील जनतेसाठी आयोध्यावारी करण्यात येणार असल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. शेतकऱ्यांसाठी आणि उद्योजकांसाठी आपण चांगले ठराव केले आहेत. कालपासून सुरू असलेल्या या अधिवेशनात भगवे वातावरण झालं असून अधिवेशनास चालना मिळाली आहे.

“आरशात त्यांनी स्वत:ला पाहावं. आरशात त्यांनी कर्तुत्व पाहावं. किती मुकूट लावून फिरणार तुम्ही? हे शेवटी लपत नाही. बाळासाहेबांचा वारसा सांगून काय करणार तोंडात नाहीतर मनगटात जोर असावा लागतो. ताकद असावी लागते. पाकिस्तानची मॅच होणार असं कळताच शिवसैनिकांनी वानखेडे तोडून टाकलं होतं”, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेची तोफ डागली आहे.

News Title – Eknath Shinde Aggressive on Uddhav thackeray

महत्त्वाच्या बातम्या

वयाच्या चाळीशीतही दिसायचंय तरुण?, मग ‘हे’ फॉलो कराच…

पाण्याच्या बिझनेसमधून करा लाखोंची कमाई, जाणून घ्या सर्व माहिती एकाच ठिकाणी

अजित पवार म्हणाले मला कुटुंबानं एकटं पाडलं…. अखेर शरद पवार यांनी स्पष्ट सांगितलं!

सोने-चांदीच्या किमतीत तेजी; पाहा काय आहेत आजचे दर

भाजप नेत्या पंकजा मुंडे मोठ्या अडचणीत; नेमकं प्रकरण काय?