सोने-चांदीच्या किमतीत तेजी; पाहा काय आहेत आजचे दर

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Gold-Silver Rate Today | सोने-चांदीच्या किमती कमी-जास्त होतानाचा ट्रेंड या दोन महिन्यात दिसून आला. आठवड्याच्या सुरुवातीला आणि शेवटी सोन्याच्या किमती वधारताना दिसल्या. आज पुन्हा एकदा सोने-चांदीचे (Gold-Silver Rate Today) भाव वाढले आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला चांगलीच झळ बसली आहे.

आज सराफा बाजारात ग्राहकांची गर्दी जरा कमी दिसून येत आहे. या तीन दिवसांत सोने 900 रुपयांनी उतरले होते, तर चांदीने मात्र दरवाढीसाठी महिन्याच्या सुरुवातीपासूनच जोर लावला होता. आजचे सोने-चांदीचे दर खाली दिलेले आहेत.

आजचे सोने-चांदीचे दर-

सोन्याच्या भावात दोन दिवसांपूर्वी मोठी घसरण झाली होती. सोने तब्बल 800 रुपयांनी स्वस्त झाले होते, म्हणजे या तीन दिवसांचा विचार करता सोने 900 रुपयांनी उतरले होते. मात्र, चांदीच्या किमती जैसे थेच राहिल्या होत्या. 13 फेब्रुवारी (Gold-Silver Rate Today) रोजी सोन्याचा भाव 110 रुपयांनी उतरला. 14 फेब्रुवारी रोजी 680 रुपयांची घसरण झाली. तर, 15 फेब्रुवारी रोजी पुन्हा सोने 100 रुपयांनी उतरले. असे जवळपास या आठवड्यात सोने 900 रुपयांनी स्वस्त झाले होते. आज मात्र या घसरणीला ब्रेक लागला आहे.

आज (17 फेब्रुवारी) सोने 200 रुपयांनी महागले आहे. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), आजच्या (Gold-Silver Rate) सोने-चांदीच्या कॅरेटनुसार किंमती ठरवल्या आहेत. त्यानुसार आता 22 कॅरेट सोने 57,250 रुपये प्रति 10 ग्रॅम, तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 62,440 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे.

चांदीच्या किमती वाढल्या-

चांदीच्या किमतीही वाढल्या आहेत. या महिन्यात चांदी 1700 रुपयांनी महागली आहे. 9 फेब्रुवारी रोजी चांदी 500 रुपयांनी महागली होती. 14 तारखेला त्याची किमत 1500 रुपयांनी घसरली, मात्र, आज 17 फेब्रुवारी रोजी किंमती 1100 रुपयांनी वाढल्या. त्यामुळे सध्या (Gold-Silver Rate Today) एक किलो चांदीचा भाव 75,600 रुपये झाला आहे.

आज सोने-चांदीच्या किमती पुन्हा वाढल्याने ग्राहकांच्या खिशाला झळ बसली आहे. वायदे बाजार आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क लागू केला जात नाही, तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत होत असते.

News Title :  Gold-Silver Rate today 17 feb  

महत्त्वाच्या बातम्या –

टीम इंडियाच्या खेळाडूची थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली दखल, मोठं कारण आलं समोर

“भाषण करायची वेळ आली की अजित पवार बाथरुमकडे पळायचे”; जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?

निलेश राणे यांच्या गाडीवर दगडफेक, चिपळूणमध्ये नेमका काय राडा घडला वाचा सविस्तर…

मोठी बातमी- धनगर आरक्षणाबाबत उच्च न्यायालयाने दिला सर्वात मोठा निर्णय

जॉनी सीन्सला स्वत: रणवीरने केली होती ‘ही’ विनंती