मोठी बातमी- धनगर आरक्षणाबाबत उच्च न्यायालयाने दिला सर्वात मोठा निर्णय

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Dhangar Reservation | मराठा आरक्षणाप्रमाणे आता धनगर आरक्षणासाठी धनगर बांधव रस्त्यावर उतरून आंदोलन करत होते. धनगर समाजाला आदिवासी प्रवर्गामध्ये सामावून घेण्याबाबत धनगर समाजाने सरकारकडे मागणी केली होती. त्या मागणीसाठी धनगर बांधवांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती, मात्र धनगर समाजाला मोठा धक्का बसला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने धनगर आरक्षणाबाबत (Dhangar Reservation) याचिका फेटाळली आहे.

धनगर समाजाने मुंबई उच्च न्यायालयात एसटी प्रवर्गामध्ये सामावून घेण्याबाबत दाद मागितली होती. मात्र ती याचिका आता मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. यामुळे वंचित असलेला धनगर समाज पुन्हा एकदा वंचितच राहणार आहे. न्यायमूर्ती गौतम पाटील आणि कोमल खाटा यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. ही याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळल्याने पुन्हा एकदा धनगर आरक्षणावर (Dhangar Reservation) प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

धनगर आणि धनगड-

धनगर आणि धनगड हे दोन्ही एकच असल्याचा दावा धनगर समाजाचा होता. याच पार्श्वभूमीवर आता मुंबई उच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. धनगर आणि धनगड हे दोन्ही वेगवेगळे असल्याचं मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलं आहे. यामुळे आता धनगर समाज आरक्षणाच्या प्रश्नावरून पुन्हा एकदा पेच निर्माण झाला आहे.

धनगर समाजाने आरक्षणासाठी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती, मात्र आता धनगर समाजाने केलेल्या सर्व याचिका न्यायालयाने फेटाळल्या आहेत. भटक्या विमुक्तांना अनुसूचित प्रवर्गामध्ये सामावून घेण्याबाबत मागणी होती. मात्र त्याचा फरसा काही फरक न पडल्याने धनगर समाजाची आरक्षणाप्रती जैसे थी परिस्थिती पाहायला मिळते.

गेल्या काही वर्षांपासून धनगर बांधवही एसटी प्रवर्गामध्ये सामावून घेण्यासाठी आंदोलन, उपोषण करत होते. त्यानंतर धनगर समाजाने मुंबई उच्च न्यायालयाकडे धाव घेतली. याकडे राज्यातील तमाम धनगर बांधवांचे लक्ष होते. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळलेल्या याचिकेमुळे आता धनगर समाज पुढं काय पाऊल उचलणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

सर्वोच्च न्यायालय आशेचा किरण-

मुंबई उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली तरीही याप्रकरणी धनगर समाज सर्वोच्च न्यायालयामध्ये एसटी आरक्षणाप्रती धाव घेऊन आपला प्रश्न मार्गी लावू शकतो. सर्वोच्च न्यायालय हा एकच शेवटचा पर्याय असून आशेचा किरण असल्याचं बोललं जात आहे.

News Title – Dhangar Reservation Mumbai high court Result

महत्त्वाच्या बातम्या

शाहरूख खानच्या चाहत्यांना धक्का, मोठा निर्णय घेणार

बारामतीत अजित पवारांचा उमेदवार ठरला?; एका फोटोमुळे मोठं गुपित झालं उघड

‘बाबांना घरातील महिलांनी..’; अमिताभ बच्चन यांच्या लेकीचा मोठा खुलासा

मेधा कुलकर्णींच्या राज्यसभा उमेदवारीनं पुणे लोकसभेची गणितं बदलली!

प्रसिद्ध अभिनेत्रीचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन, बॉलिवूडवर शोककळा!