शाहरूख खानच्या चाहत्यांना धक्का, मोठा निर्णय घेणार

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Shahrukh Khan | बाॅलिवूडच्या नावाजलेल्या अभिनेत्यांपैकी सर्वांचा लाडका किंग खान आपल्या प्रोफेशनल लाईफमुळे आणि पर्सनल लाईफमुळे कायम चर्चेत असतो. 90 चं दशक गाजवणारा अभिनेत्याची क्रेज आजही काही कमी नाहीये. अभिनेता शाहरुख खान छोट्या पडद्यापासून ते रुपेरी पडद्यावर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. त्याचा चित्रपट बाॅक्स ऑफिसवर कमाई करणार याची खात्री चित्रपटाच्या दिग्दर्शकाला आणि त्याच्या चाहत्याला असायची. आज देखील शाहरुख खान वेगवगेळ्या भूमिकेत चित्रपटाच्या स्क्रिनवर झळकत असतो. मात्र त्याच्या चाहत्यांसाठी एक मोठी माहिती समोर आली आहे.

काय आहे प्रकरण?

अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) ने बाॅलिवूडमधून निवृती घेण्याच्या निर्णय घेतला आहे. नुकताच शाहरुख खानला निवृत्तीबद्दल विचारण्यात आलं. यावर अभिनेत्याने शेवटचा सिनेमा आणि निवृत्तीबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त शाहरुख खान आणि अभिनेत्याच्या शेवटच्या सिनेमाची चर्चा रंगली आहे.

निवृत्तीबाबत विचारल्यावर शाहरुख खान म्हणाला की, ‘सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझा शेवटचा सिनेमा हीट ठरवा आणि जगभरात सिनेमाची चर्चा असावी अशी माझी इच्छा आहे..’एवढंच नाही तर, शाहरुख खान याने चाहत्यांना उर्दू आणि अरेबिक शिकण्याचा देखील सल्ला दिला आहे. त्याच्या या वक्तव्याने तो लवकरच निवृत्ती घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

सोशल मीडियावर चर्चा-

शाहरुख खान (Shahrukh Khan) सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसाठी रोज नवनवीन फोटोज व्हिडीओ शेअर करत असतो. सोशल मीडियावर त्याची फॅन फॅालोइंग देखील जबरदस्त आहे. आज देखील तरुण तरुणी तिचे चित्रपट आवडीने पाहतात. त्याचा चित्रपटासाठी तरुण आणि तरुणींमध्ये मोठी क्रेज असते. काही दिवसांपूर्वी त्याचा डंकी ओटीटीवर आला आहे. याचा टिझर स्वतः शाहरुखने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर टाकलं आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Netflix India (@netflix_in)

सुहाना खानची चर्चा-

शाहरुख खान याच्या आगामी सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, किंग खान ‘किंग’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात शाहरुख खान याच्यासोबत लेक सुहाना खान देखील महत्त्वाची भूमिका साकारणार असल्याची चर्चा रंगत आहे. पण यावर अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त शाहरुख खान याची चर्चा रंगली आहे.

News Title : Shahrukh Khan to retire from bollywood

महत्त्वाच्या बातम्या-

‘बाबांना घरातील महिलांनी..’; अमिताभ बच्चन यांच्या लेकीचा मोठा खुलासा

मेधा कुलकर्णींच्या राज्यसभा उमेदवारीनं पुणे लोकसभेची गणितं बदलली!

प्रसिद्ध अभिनेत्रीचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन, बॉलिवूडवर शोककळा!

सुंदर आणि तजेलदार त्वचा हवीये?, मग रोज करा ‘या’ फळांचं सेवन

सर्व्हेमध्ये झाला मोठा खुलासा, महिलांना आवडतात ‘अशा’ प्रकारचे पुरुष