सुंदर आणि तजेलदार त्वचा हवीये?, मग रोज करा ‘या’ फळांचं सेवन

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Glowing Skin Tips | थंडी आता हळूहळू कमी होत आहे. तर उन्हाळ्याचे चटके जाणवायला सुरुवात झाली आहे. ऊन म्हटलं की, घाम आणि गर्मीचा प्रचंड त्रास होतो. त्यात त्वचाही लवकरच काळवंडते. आपली त्वचा सुंदर (Glowing Skin Tips) आणि तजेलदार असावी यासाठी अनेक महागडे प्रोडक्टस वापरले जातात.

महागड्या क्रीम आणि आणि महागडी औषधही घेतली जातात. मात्र, आपली त्वचा तेव्हाच अधिक तजेलदार दिसते, जेव्हा आपण सर्व घटकयुक्त आहार घेतो. शरीराला सर्व पोषक तत्वे युक्त आहार मिळाला की, त्वचा नैसर्गिकरित्या खुलून दिसते. यासाठी फळांचेही सेवन करणे आवश्यक असते. तुम्हालाही जर सुंदर आणि तजेलदार त्वचा हवी असेल तर तुम्हीही आजपासूनच फळांचे सेवन करणे सुरू करा. तुम्हाला ही फळे कोणती याबाबत सविस्तर इथे सांगणार आहोत.

‘या’ फळांचे सेवन केल्यास होईल फायदा

संत्री : संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते जे त्वचा निरोगी ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे जीवनसत्व आहे. कोलेजन संश्लेषणासाठी व्हिटॅमिन सी देखील आवश्यक आहे, जे त्वचा (Glowing Skin Tips) घट्ट ठेवते आणि चेहऱ्यावर सुरकुत्या येण्यापासून रोखते.

यामुळे त्वचा लवचिक आणि तरुण राहते. याशिवाय व्हिटॅमिन सी त्वचेला दुरुस्त करण्याचे काम करते. संत्र्यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म देखील असतात जे त्वचेची जळजळ आणि लालसरपणा कमी करण्यास मदत करतात. संत्री फळ चवीलाही छान असते. आता उन्हाळ्यात तर हे फळ अत्यंत लाभदायक असते.तुम्ही संत्रीचे सालटे सुकवून त्याची पावडरही चेहऱ्यावर लावू शकता. याने चेहरा उजळून दिसतो.

सफरचंद : सफरचंद हे फळ पोषक तत्वांचा खजिना आहे. यामध्ये फायबर, व्हिटॅमिन ए, बी आणि अँटिऑक्सिडंट्ससह अनेक पोषक घटक असतात जे शरीरातील फ्री-रॅडिकल्सशी लढतात. शरीरातील वृद्धत्व वाढवण्यासाठी फ्री रॅडिकल्स जबाबदार असतात. हे पेशींचे नुकसान करते आणि आपली त्वचा अकाली वृद्ध होते.

त्यामुळे सफरचंदातील पोषक घटक या फ्री-रॅडिकल्सशी (Glowing Skin Tips) लढतात आणि आपल्या त्वचेचे संरक्षण करतात. सफरचंद रोज खायला हवे. ते आरोग्यासाठीदेखील चांगले असते. तुम्ही आजपासून सफरचंद खायला सुरुवात करू शकता.

बेरीज : स्ट्रॉबेरी, रास्पबेरी, ब्लूबेरी आणि गोजी बेरी ही फळे त्यांच्या उत्कृष्ट अँटिऑक्सिडंट्ससाठी ओळखली जातात. जी शरीराला मुक्त रॅडिकल्सपासून वाचवतात. याशिवाय, ते मृत त्वचेच्या पेशी काढून टाकते आणि छिद्र उघडते, ज्यामुळे तुमच्या त्वचेला ऑक्सिजन मिळण्यास मदत होते.

या फळांमध्ये एंजाइम असतात जे वृद्धत्वाची प्रक्रिया कमी करतात आणि चेहरा उजळतात. हे नवीन पेशी वाढवून त्वचेचा पोत देखील सुधारतात. त्यामुळे तुम्ही स्ट्रॉबेरी, रास्पबेरी, ब्लूबेरी आणि गोजी बेरी ही फळे खायला हवी.

News Title : Glowing Skin Tips

महत्त्वाच्या बातम्या –

मराठा आरक्षणाबाबत शिंदे सरकारची सर्वांत मोठी घोषणा !

मेधा कुलकर्णींना उमेदवारी देण्यामागचं कारण समोर; भाजपचा मोठा प्लॅन!

कसोटी पदार्पणात लेकाची अर्धशतकी खेळी अन् बापाच्या डोळ्यात पाणी!

जया अमिताभ बच्चन यांच्या संपत्तीबाबत महत्त्वाची माहिती आली समोर!

चांगल्या बायकोत असतात ‘या’ 3 गोष्टी, नवरा कायम राहतो खूश!