मेधा कुलकर्णींना उमेदवारी देण्यामागचं कारण समोर; भाजपचा मोठा प्लॅन!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Medha Kulkarni | आगामी लोकसभा निवडणूक जवळ येत आहे. यावरून आता पक्षांमध्ये जागावाटपावरून बैठका होताना दिसत आहेत. सध्या लोकसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केलं जात आहे.

मागील विधानसभा निवडणुकीमध्ये मेधा कुलकर्णी यांचं तिकिट कापल्याने चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिली. मात्र आता भाजपने मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) यांना राज्यभेसाठी संधी दिली असल्याची माहिती समोर आली आहे.

भाजपचा मोठा प्लॅन

मेधा कुलकर्णी यांचं विधानसभेचं तिकिट कापलं होतं आणि त्याऐवजी चंद्रकांत पाटील यांना तिकिट दिलं होतं यामुळे अनेक ब्राह्मण मतदारांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र आता राज्यसभेसाठी मेधा कुलकर्णी यांचं नाव चर्चेच आहे. यामुळे आता ब्राह्मण मतदारांच्या चेहऱ्यावर आनंद आहे. यामुळे आता पुणे लोकसभेचं गणित बदलणार आहे.

एका बाजूला ब्राह्मण उमेदवाराला उमेदवारी दिल्याने ब्राह्मण समाज आनंदी आहे. तर दुसरीकडे मराठा मतदारांना खुश करण्यासाठी भाजप लोकसभेसाठी मराठा उमेदवार देणार असल्याची माहिती आहे. आगामी पुणे लोकसभा निवडणुकीसाठी मतदारसंघामध्ये माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक आणि भाजपचे माजी राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांच्या नावाची चर्चा आहे.

पुणे मतदारसंघासाठी भाजपची खेळी

राज्यसभेची उमेदवारी मेधा कुलकर्णी यांना दिल्याने ब्राह्मण समाज खुश करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. त्यामुळे कुलकर्णी यांना राज्यसभेसाठी संधी दिल्याने लोकसभेची गणितं आता बदलणार आहेत. गिरीश बापट खासदार होते तेव्हा त्यांच्या निधनानंतर पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक झाली नाही.

ब्राह्मण उमेदवार दिला नाही

कसबा पोटनिवडणूक पार पडली तेव्हा देखील हेमंत रासने यांना उमेदवारी देण्यात आली. त्यांच्याविरोधात रवींद्र धंगेकर होते. यावेळी देखील ब्राह्मण उमेदवार न दिल्याने रवींद्र धंगेकर यांचा विजय झाला. याठिकाणी ब्राह्मण मतदारांनी धंगेकर यांना मतदान केलं असल्याचे तर्क लावले जात आहेत.

पुणे लोकसभेसाठी भाजपची मोठी चाल 

News Title – Medha Kulkarni Pune Election News Update

महत्त्वाच्या बातम्या

मनोज जरांगे पाटील यांनी तोडली सलाईन, म्हणाले…

उर्फी जावेदचा ‘वेलेंटाईन डे’ लूक तूफान व्हायरल, सोशल मीडियावर ट्रोल

मोठी बातमी! माजी मंत्र्यांचा ठाकरेंना ‘जय महाराष्ट्र’, राजीनामा दिला, कारणही सांगितलं

‘लेका’ला टीम इंडियाची कॅप अन् वडिलांना अश्रू अनावर; मुंबईकर सर्फराजसाठी भावनिक क्षण

“भाजपपासून दूर राहा नाहीतर बॉम्बने उडवून टाकू”, मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी