मनोज जरांगे पाटील यांनी तोडली सलाईन, म्हणाले…

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Manoj Jarange Patil | मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) मुंबईला जात असताना कोट्यवधी मराठा बांधवांना सोबत घेत मुंबईकडे कूच केली होती. मात्र त्यांना नवी मुंबईतील वाशी येथे अडवण्यात आलं. कोट्यवधींच्या संख्येने मराठा बांधव जर मुंबईत पोहोचले असते तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असता. म्हणून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अध्यादेश काढत मराठा बांधवांच्या मागण्या मान्य केल्या, मात्र आता सरकार आश्वासनावर कोणतंही पाऊल उचलायला मागत नाहीत. म्हणून आता मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केलं आहे.

सरकारने दिलेल्या आश्वासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून आता मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा एकदा 10 फेब्रुवारीपासून उपोषणास सुरूवात केली आहे. मात्र यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी पाण्याचा देखील त्याग केला आहे. यामुळे मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे.

जरांगे यांच्या तब्येतीच्या तपासासाठी जालना जिल्ह्यातील काही डॉक्टर आले होते त्यावेळी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी सलाईन लावण्यास नकार दिला. ते पाणी देखील प्राशन करत नव्हते. त्यांच्या नाकातून रक्तस्त्राव होताना दिसत आहे. यावेळी मनोज जरांगे पाटील झोपले असताना त्यांना सलाईन लावण्यात आली. मात्र सलाईन न लावण्याबाबत त्यांनी सांगितलं. “मला झोपेत सलाईन लावता सलाईन लावायची असेल तर अंमलबजावणी कधी करता? ते सांगा”, असं सरकारला उद्देशून म्हणाले.

सलाईन लावण्यासाठी नकार

अंतरवाली सराटीतील गावकऱ्यांनी तसेच मराठा बांधवांनी मनोज जरांगे पाटील यांना सलाईन लावण्याबाबत विनंती केली. त्यांना पाणी पिण्यास सांगितले तसेच डॉक्टरकडे उपचार घेण्याची विनंती केली मात्र जरांगे यांनी ऐकलं नाही. जरांगेंचा डोळा लागल्यानंतर सलाईन लावण्यात आली तेव्हा त्यांनी सलाईन लावण्यास विरोध केला आहे. मात्र यामुळे आता मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे.

सरकारला धारेवर धरा असं जरांगे पाटील यांनी वक्तव्य केलं आहे. “मी एकटा मुंबईमध्ये जावून बसेल लवकरात लवकर अंमलबजावणी करा”, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत. यावेळी बोलत असताना त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. “उपोषण करताना मेलो तर मला तसंच त्यांच्या दारात नेऊन टाका”, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

नागरिकांकडून उपचार घेण्याची विनंती

मनोज जरांगे पाटील गेली पाच दिवस जलप्राशन करत नाहीत. तसेच कोणता उपचारही घेत नाहीत. म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी टोकाची भूमिका घेत पाण्याचा आणि उपचाराचा त्याग केला आहे. यामुळे आता नागरिकांनी मनोज जरांगे पाटील यांना उपचार घेण्याबाबत विनंती केली आहे. मात्र मनोज जरांगे पाटील आपल्या भमिकेवर ठाम आहेत.

News Title – Manoj jarange patil health update

महत्त्वाच्या बातम्या

‘या’ बड्या नेत्याचा मनोज जरांगे पाटील यांना सल्ला, म्हणाले…

“रोहितला कर्णधारपदावरून काढण्याचा निर्णय योग्यच”, माजी खेळाडूचं मोठं वक्तव्य

शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार?, पुण्यातील मोदी बागेत बैठक सुरू

भारतीय कुस्ती महासंघावरील बंदी हटवली, देशाच्या तिरंग्याखाली खेळण्यासाठी खेळाडूंचा मार्ग मोकळा

‘या’ शेअरमुळे गुंतवणूकदारांना लागली लॉटरी; डबल फायदा