‘या’ बड्या नेत्याचा मनोज जरांगे पाटील यांना सल्ला, म्हणाले…

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Manoj Jarange Patil | गेल्या काही महिन्यांपासून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे मराठा आरक्षणासाठी लढत आहेत. मात्र सरकार हे प्रकरण गांभिर्याने घेत नाही. मनोज जरांगे पाटील यांनी अनेकदा आंदोलन केलं आणि उपोषणही केलं आहे. सरकारने वाशी येथे मराठा समाजाचा मोर्चा थांबवून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाबाबत अध्यादेश दिला. मात्र त्यावर अजून कोणतीही अंमलबजावणी नसल्याने मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणासाठी पुन्हा 10 तारखेपासून उपोषण केलं आहे. यामुळे आता मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे.

मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा उपोषण केलं आहे. त्यांनी पाण्याचा देखील त्याग केला आहे. तसेच त्यांच्या नाकातून रक्त येत आहे. यामुळे सध्या त्यांची प्रकृती नाजूक असून डॉक्टरांनी त्यांना पाणी पिण्यास सांगितलं तसेच नाडी तपासण्यासाठी सांगितली मात्र मनोज जरांगे पाटील यांनी डॉक्टरांचं देखील ऐकलं नाही. याप्रकरणावर आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील यांना सल्ला दिला आहे.

प्रकाश आंबेडकर यांचा सल्ला 

मनोज जरांगे पाटील अनेक महिन्यांपासून सरकारकडे आरक्षणाची मागणी करत आहेत. मात्र सरकार केवळ आश्वासन देत आहे. यावर आता प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील यांना सल्ला दिला आहे. “मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणासाठी शरीराचा त्याग करू नये. मराठा आरक्षणाची जागृती करणं गरजेचं होतं ते उपोषणाच्या माध्यमातून होत आहे. आता मराठा आरक्षण हे ध्येय असेल,” असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.

“स्वतंत्र निवडणूक लढवावी”

“मराठा आरक्षणासाठी शरीराचा त्याग करत आहेत. मराठा आरक्षणाची जागृती उपोषणातून झाली आहे. आता मराठा आरक्षण हेच एक ध्येय आहे. मात्र त्यासाठी त्यांनी जालना मतदारसंघातून निवडणूक लढवावी. कोणत्याही इतर पक्षाची मदत घेऊ नये. कारण पक्षाची मदत घेतली तर पक्षाची बंधने येतात. म्हणून त्यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवावी,” असा सल्ला प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिला आहे.

“गरीब मराठ्यांसाठी आरक्षणाचं वेगळं ताट असावं आणि ओबीसींसाठी आरक्षणाचं वेगळं ताट असावं अशी माझी पहिल्यापासून भूमिका आहे. जर असं नाही झालं तर टिकणारे आरक्षण मिळणार नाही. म्हणून गरीब मराठ्याचं ताट आणि ओबीसी समाजाचं ताट हे वेगवेगळं असावं”, असं प्रकाश आंबेडकर यांनी सल्ला दिला आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी सांगितला मतदारसंघ

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी निवडणूक लढवण्याचा सल्ला दिला आहे. तसेच त्यांनी कोणत्याही पक्षातून निवडणूक न लढवता स्वतंत्र निवडणूक लढवा असा सल्ला दिला आहे. त्यानंतर त्यांनी मतदारसंघ ही सांगितला आहे. जालना मतदारसंघातून निवडणूक लढवावी असा सल्ला प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.

News Title – Manoj jarange patil join politics prakash ambedkar statement 

महत्त्वाच्या बातम्या

‘ये हे मोहब्बते’ फेम दिव्यांका त्रिपाठीचा धक्कादायक खुलासा!

Valentine’s Day दिवशी आनंदवार्ता! सोनं झालं स्वस्त, जाणून घ्या दर

‘या’ खेळाडूने मोडला रोहित शर्माचा रेकॉर्ड!

भाजपचं मोठं सरप्राईज; राज्यसभेसाठी ‘या’ 3 उमेदवारांची घोषणा

“स्वतःची औकात ओळख, अंथरुणावर पडून…”; नारायण राणेंचा जरांगे पाटलांना इशारा