‘ये हे मोहब्बते’ फेम दिव्यांका त्रिपाठीचा धक्कादायक खुलासा!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Divyanka Tripathi | छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीचा (Divyanka Tripathi) चाहतावर्ग प्रचंड मोठा आहे. सोशल मिडियावर ती सतत अॅक्टिव राहत असते. तिचे फॉलोवर्सदेखील लाखोंच्या संख्येत आहेत. नेहमी दिव्यांका नवीन फोटो आणि रील पोस्ट करत ट्रेंडमध्ये राहत असते. नुकताच एका मुलाखतीमध्ये तिने धक्कादायक खुलासा केला आहे.

त्यामुळे दिव्यांका चर्चेत आली आहे. तिचा पती विवेक दहिया हा प्रचंड नैराश्यात गेल्याचे दिव्यांकाने सांगितले. एवढेच नाही तर तिने निर्मात्यांच्या उल्लेख करत गंभीर आरोपही केले आहेत. त्यामुळे सध्या दिव्यांकाच्या वक्तव्याचीच चर्चा रंगत आहे.

काय म्हणाली Divyanka Tripathi ?

दिव्यांका (Divyanka Tripathi) आणि तिचा पती विवेक दहिया दोघेही डान्स रिॲलिटी शो झलक दिखला जा 11 मध्ये सहभागी झाले होते. या शोमध्ये दोघांनी चांगलाच मंच गाजवला होता. नुकतीच तिने एक मुलाखत देत धक्कादायक खुलासे केले आहेत. झलक दिखला जा 11 मधून बाहेर पडल्यानंतर माझ्या पतीला मोठा धक्का बसला, असे दिव्यांकाने म्हटले आहे.

‘या शो मधून बाहेर पडल्यानंतर तो डिप्रेशनचा शिकार झाला. काही दिवस तो (विवेक दहिया) नैराश्यात गेला होता.’, असे दिव्यांका म्हणाली आहे. तुम्ही तिथे सर्व काही देत असता. जेव्हा आपण निर्मात्यांबद्दल बोलतो तेव्हा ते त्यांच्यासाठी एक बिझनेस मॉडेल असते. परंतू जे लोक काम करतात ते खरोखरच खूप जास्त मनापासून करतात, असे म्हणत दिव्यांकाने नेमका कुणावर निशाणा साधला याबाबत तर्क लावले जात आहे.

“आपण नेहमी आपलं बेस्ट देत असतो. अगदी 100 टक्के आपण काम करत असतो. मन लावून आपण ती गोष्ट साध्य करायचा प्रयत्न करत असतो. पण, प्रोड्यूसरसाठी ते सर्वकाही बिझनेससारखे आहे. हे सर्व वेगळं आहे.”, असे दिव्यांका त्रिपाठी म्हणाली आहे. तिची ही मुलाखत आता चर्चेत आली आहे.

‘ये हे मोहब्बते’ पासून मिळाली प्रसिद्धी

अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीला (Divyanka Tripathi)  स्टार प्लसवरील ‘ये हे मोहब्बते’ या मालिकेपासून प्रसिद्धी मिळाली. 2013 साली ही मालिका आली होती. यात तिने ईशीकाची भूमिका साकारली होती. रमण भल्ला आणि ईशीका यांची जोडी तेव्हा प्रेक्षकांना प्रचंड भावली होती. रूहीची आई म्हणूनही दिव्यांकाच्या भूमिकेचं कौतुक केलं गेलं.

News Title- Divyanka Tripathi shocking revelation

महत्वाच्या बातम्या- 

शेतकरी आंदोलन! …तर यावेळी देखील होणार हजारो कोटींचे नुकसान, व्यापाऱ्यांना चिंता

इशान किशनला घमंडीपणा नडणार; BCCI कडक कारवाई करण्याच्या तयारीत

…तर तुमचे पैसे बुडालेच म्हणून समजा; सेबीचा गुंतवणूकदारांना इशारा!

“भाजपने राष्ट्रपतीपदाची ऑफर दिली पण मी…”, प्रकाश आंबेडकरांचा मोठा गौप्यस्फोट

अभिनेत्री, राजकारणी अन् अध्यात्माचा मार्ग; 35 व्या वर्षी संपवलं जीवन, कोण होती मल्लिका?