इशान किशनला घमंडीपणा नडणार; BCCI कडक कारवाई करण्याच्या तयारीत

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ishan Kishan | भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज इशान किशन मागील काही कालावधीपासून क्रिकेटपासून दूर आहे. त्याने नोव्हेंबर 2023 पासून एकही सामना खेळला नाही. सध्या तो देशांतर्गत क्रिकेटही खेळत नाही. अशा स्थितीत त्याचे संघात पुनरागमन होणे कठीण आहे. किशनशिवाय इतर खेळाडूंनी देखील देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळण्यास नकार दिल्याने बीसीसीआय नाराज आहे. त्यामुळे बीसीसीआय किशनसह काहींवर कडक कारवाई करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

बीसीसीआयने भारतीय संघाबाहेर असलेल्या खेळाडूंना रणजी ट्रॉफीची पुढील फेरी खेळण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती ‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेने दिली. दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर इशान किशनला संघातून वगळण्यात आले होते. संघ व्यवस्थापनाने त्याला पुनरागमन करण्यासाठी देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचा सल्ला दिल्याचे कळते. मात्र, यष्टिरक्षक फलंदाजाने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये खेळण्यास नकार दिला.

किशनला घमंडीपणा नडणार?

सध्या किशन बडोद्यात आयपीएल 2024 ची तयारी करताना दिसत आहे. तो आयपीएलमधील त्याच्या मुंबई इंडियन्सच्या संघाचा कर्णधार हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्यासोबत सराव करताना दिसला. भारतीय संघाबाहेर असलेल्या खेळाडूंनी 16 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या पुढील फेरीपूर्वी आपापल्या रणजी संघात सहभागी व्हावे, अशा कडक सूचना बीसीसीआयने दिल्या आहेत.

BCCI कारवाई करणार

दरम्यान, इशान किशन आयपीएल 2024 आधी डीवाय पाटील स्पर्धेत खेळताना दिसणार आहे. मात्र, रणजी ट्रॉफीमध्ये तो खेळणार का याबाबत काहीच स्पष्ट झाले नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, इशान किशनला सततच्या क्रिकेटमुळे आपल्या कुटुंबाला वेळ देता आला नाही, त्यामुळे त्याने इतके दिवस क्रिकेटमधून सुट्टी घेतली. या काळात तो क्रिकेटपासून दूर राहिला.

भारतासाठी आतापर्यंतच्या कारकिर्दीत इशान किशनने दोन कसोटी, 27 वन डे आणि 32 ट्वेंटी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. 25 वर्षीय यष्टीरक्षक फलंदाजाने तिन्ही फॉरमॅटमध्ये अनुक्रमे 78, 933 आणि 796 धावा केल्या आहेत. पण, देशांतर्गत क्रिकेट खेळण्यास विरोध करणाऱ्या इशानवर कारवाई होणार का हे पाहण्याजोगे असेल. भारतीय संघ सध्या मायदेशात इंग्लंडविरूद्ध कसोटी मालिका खेळत असून 15 तारखेपासून राजकोट येथे तिसरा सामना खेळवला जाईल.

राजकोटी कसोटीसाठी भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार, सर्फराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक ), केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा (फिटनेसवर अवलंबून), अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार आणि आकाश दीप.

News Title- BCCI may take action against India wicket-keeper batsman Ishan Kishan for refusing to play domestic cricket
महत्त्वाच्या बातम्या –

…तर तुमचे पैसे बुडालेच म्हणून समजा; सेबीचा गुंतवणूकदारांना इशारा!

“भाजपने राष्ट्रपतीपदाची ऑफर दिली पण मी…”, प्रकाश आंबेडकरांचा मोठा गौप्यस्फोट

अभिनेत्री, राजकारणी अन् अध्यात्माचा मार्ग; 35 व्या वर्षी संपवलं जीवन, कोण होती मल्लिका?

भ्रष्ट नेत्यांना पक्षात घेणं हीच मोदींची गॅरंटी; उद्धव ठाकरेंची सडकून टीका

“माझ्या जीवाला धोका..”,जॅकलीन फर्नांडिसच्या आरोपाने खळबळ