Uddhav Thackeray | काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सोमवारी आमदारकीचा तथा पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. चव्हाणांचा राजीनामा हा काँग्रेससह महाविकास आघाडीसाठी मोठा धक्का मानला जात आहे. यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्ताधारी भाजपला सुनावले आहे. अशोक चव्हाणांनी मंगळवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे आणि आशिष शेलार यांच्या उपस्थितीत कमळ हाती घेतले.
अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. यावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी भाजपवर टीकास्त्र सोडले. मोदींची गॅरंटी या भाजपच्या घोषणेचा खरपूस समाचार घेत ते म्हणाले की, भ्रष्ट नेत्यांचा समावेश करून त्यांना मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्रिपद देणे हे भारतीय जनता पक्षाचे मुख्य काम आहे.
अशोक चव्हाणांचा काँग्रेसला रामराम
सत्ताधारी भाजपवर हल्लाबोल करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, देशात हुकूमशाहीच्या रूपात एक नवीन विषाणू पसरत आहे. आपल्या सरकारमध्ये आपण कोरोना पाहिला पण आज देशात एक नवीन विषाणू आला आहे, त्याला मोदी सरकारची हुकूमशाही म्हणतात. त्यामुळे मी जनतेला विनंती करतो की, त्यांनी आपले हात धुवावे आणि या हुकूमशाही विषाणूचा देशातून नायनाट करावा.
तसेच ‘मोदी गॅरंटी’ या घोषणेवर बोलताना उद्धव ठाकरेंनी भाजपवर बोचरी टीका केली. भ्रष्ट नेत्यांना भाजपमध्ये समाविष्ट करणे हेच त्यांचे काम आहे. नंतर त्यांना राज्यसभेच्या जागा दिल्या जातील, त्यांना उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री बनवले जाईल तसेच त्यांना ईडी आणि सीबीआयच्या खटल्यातून मुक्त केले जाईल, असे त्यांनी म्हटले.
Uddhav Thackeray भाजपवर बरसले
दरम्यान, महाराष्ट्राच्या रचनात्मक विकासासाठी काम करण्याचा दावा करत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला. याशिवाय शेतकऱ्यांच्या आंदोलनावरून उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर टीका करत शेतकऱ्यांना गृहमंत्री अमित शाह यांची भेट घ्यायची होती, पण त्यांच्याकडे वेळ नाही आणि ते या विषयावर गंभीर नसल्याचेही ते म्हणाले.
अशोक चव्हाण यांची नांदेड जिल्ह्यावर मजबूत पकड असल्याने भाजपला चांगला फायदा झाल्याचे दिसते. काँग्रेसमध्ये आपल्याला विचारात घेतले जात नाही यावरून चव्हाणांची नाराजी होती. याशिवाय प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि अशोक चव्हाण यांच्यात वाद असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या.
News Title- Uddhav Thackeray has criticized the BJP and the Prime Minister that taking corrupt leaders into the party is Modi’s guarantee
महत्त्वाच्या बातम्या –
“माझ्या जीवाला धोका..”,जॅकलीन फर्नांडिसच्या आरोपाने खळबळ
‘वेलेंटाईन वीक’ मध्ये ‘या’ वस्तूंच्या खरेदीत वाढ!
झटपट वजन कमी करायचंय?, मग ‘हा’ डाएट प्लॅन तुमच्यासाठीच
“…म्हणून लोक तुमच्यावर थुंकत आहेत”, अशोक चव्हाणांवर संजय राऊत भडकले
भारतीय क्रिकेटवर शोककळा ! टीम इंडियाच्या माजी कर्णधाराचं निधन