“…म्हणून लोक तुमच्यावर थुंकत आहेत”, अशोक चव्हाणांवर संजय राऊत भडकले


Ashok chavan | राज्यामध्ये अशोक चव्हाण (Ashok chavan) यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यभरातून प्रतिक्रिया येत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर घेतलेला निर्णय यामध्ये भाजपचं राजकारण असल्याचं बोललं जात आहे. तसेच अशोक चव्हाण यांनी आदर्श घोटाळा केला आणि ते आता भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत. यावर आता संजय राऊत यांनी अशोक चव्हाण यांचे बारा वाजले आहेत, अशी खोचक टीका केली आहे.

अशोक चव्हाण (Ashok chavan) यांनी काँग्रेस पक्षाला राजीनामा दिला आणि आता ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. यावर ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपवरही टीकेची फायरिंग केली आहे. अशोक चव्हाण यांनी आदर्श घोटाळा केला होता. यामुळे ते आता भाजप पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत. यावर संजय राऊत म्हणाले की, “जणता तुमच्यावर थुंकत आहे.” संभाजीनगरमध्ये माध्यमांशी संवाद साधत असताना संजय राऊत यांनी भाजपचे कान टोचले आहेत.

राऊतांचा चव्हाणांवर हल्लाबोल

गेल्या काही वर्षांमध्ये राज्याच्या राजकारणामध्ये कधी घडलं नव्हतं ते आज घडताना दिसत आहे. ‘हमे तो अपनोने लूट लिया’, हा चित्रपटातील संवाद सध्या सुरू असलेल्या राजकारणाशी संबंधीत असलेला पाहायला मिळतोय. आपल्याच पक्षातील नेते आपलाच पक्ष फोडून बंड करताना दिसत आहेत. यावर आता संजय राऊत यांनी टीका केली आहे. महाविकास आघाडीतील नेते महायुतीत गेल्यानं संजय राऊत यांनी टीकेची तोफ डागली आहे. “अशोक चव्हाण म्हणजे काँग्रेस नाही, एकनाथ शिंदे म्हणजे शिवसेना नाही, अजित पवार म्हणजे राष्ट्रवादी नाही. महाविकास आघाडीवर जागावाटपावर काहीही फरक पडणार नाही”, असं राऊत म्हणाले आहेत.

राऊतांचा खळबळजनक दावा

“अशोक चव्हाण हे दोन वर्षांआधी पक्ष सोडणार होते. एकनाथ शिंदे आणि अशोक चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करणार होते, मात्र त्यांना आता मुहूर्त आला आहे. काँग्रेस मुक्त भारत ही घोषणा बदलली पाहिजे. काँग्रेस शुद्धीकरणचे महात्मा गांधींचे स्वप्न होतं. ते स्वप्न भाजपने स्विकारलेलं दिसत आहे. काँग्रेसचे लोकं घेत भाजपसोबत युती करत आहेत. अशा पद्धतीने सुरू राहिलं तर आगामी निवडणुकीत भाजप 200 पार जाणार नाही”, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

चव्हाणांवर राऊत बरसले

“मराठवाड्याचे स्वत:ला भाग्यविधाते म्हणणारे 12 वाजण्याच्या मुहूर्तावर स्वत:चे 12 वाजवून घेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला काय तोंड दाखवणार? खोटेपणाचा आणखी एक भाजपने रोवलाय का? शहिदांचा अपमान केल्याचं पंतप्रधान नांदेडला येऊन सांगतात. मग आता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश देत शहिदांचा अपमान धुवून टाकला का?”, असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

“अशोक चव्हाण हे दोन वर्षांपासून पक्ष सोडणार होते. एकनाथ शिंदे यांच्यासोबत ते भाजपसोबत जाणार होते. गेल्या अनेक दिवसांपासून पक्ष सोडण्यासाठी धडपड होते. पण त्यांना आता मुहूर्त मिळाला”, असं राऊत म्हणाले.

News Title – Ashok chavan resign after sanjay raut statement

महत्त्वाच्या बातम्या

अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याचं खरं कारण आलं समोर!

इंग्लंडविरूद्धच्या तिसऱ्या सामन्यात भारताची ‘कसोटी’! स्टार खेळाडू बाहेर, नव्या चेहऱ्याला संधी

रेशन दुकानांवर पंतप्रधान मोदींचे फोटो लावले जाणार नाहीत; मुख्यमंत्र्यांची आक्रमक भूमिका

भाजपने अशोक चव्हाणांना राज्यसभेवर पाठवले तर तो शहिदांचा अपमान ठरेल – उद्धव ठाकरे

“अशोक चव्हाण यांनी आमच्या पक्षात यावं”, केंद्रीय राज्यमंत्र्यांची खुली ऑफर