भाजपने अशोक चव्हाणांना राज्यसभेवर पाठवले तर तो शहिदांचा अपमान ठरेल – उद्धव ठाकरे

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Uddhav Thackeray | अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा हात सोडल्यानंतर राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसची सोडलेली साथ हा पक्षासह महाविकास आघाडीला मोठा धक्का मानला जात आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर सडकून टीका केली. देशात दबावतंत्राचे राजकारण सुरू असून आदर्श घोटाळ्याची भीती दाखवूनच अशोक चव्हाणांना राजीनामा देण्यास भाग पाडले असल्याचे ठाकरेंनी म्हटले.

उद्धव ठाकरे सोमवारी छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सत्ताधाऱ्यांवर टीकेचे बाण सोडले. उद्धव ठाकरे यांनी सोमवारी आदर्श गृहनिर्माण घोटाळा प्रकरणाचा दाखला देत अशोक चव्हाण यांच्यावर निशाणा साधला. तसेच भाजपने त्यांना राज्यसभेवर पाठवल्यास तो शहीद जवानांचा अपमान ठरेल, असे म्हटले. अशोक चव्हाण यांनी काँग्रेस आणि विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून, त्यानंतर ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

अशोक चव्हाणांनी सोडला ‘हात’

छत्रपती संभाजीनगर शहरातील सभेला संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदेड येथे जाऊन चव्हाण यांनी केलेल्या भ्रष्टाचाराबाबत भाष्य केले होते. चव्हाण यांनी शहीद जवानांच्या कुटुंबीयांचा अपमान केल्याचे ते म्हणाले होते. त्यामुळे जर चव्हाणांना राज्यसभेवर पाठवले तर तो जवानांचा अपमान ठरेल अशी टीका ठाकरेंनी केली.

शिवसेना फुटीनंतर आणि पक्ष तसेच चिन्ह एकनाथ शिंदेंना मिळाल्यानंतर भाजप आणि उद्धव ठाकरे यांच्यातील संघर्ष वाढला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत सातत्याने भाजपवर बोचरी टीका करत असतात. उद्धव ठाकरे देखील सत्ताधाऱ्यांवर टीका सोडण्याची संधी सोडत नाहीत. आगामी काळात काँग्रेसमधून आलेला व्यक्तीच भाजपचा अध्यक्ष असेल असेही त्यांनी सांगितले.

Uddhav Thackeray यांचा घणाघात

उद्धव ठाकरे म्हणाले की, भाजपच्या नेत्यांनी अशोक चव्हाणांचा आदर्श गृहनिर्माण घोटाळा हा सैनिकांचा अपमान असल्याचे म्हटले होते. त्यामुळे मी पंतप्रधानांना विचारतो की ज्या व्यक्तीने शहीद जवान आणि त्यांच्या कुटुंबियांचा अपमान केला आहे, अशा व्यक्तीला तुम्ही राज्यसभेवर पाठवणार आहात का?

अशोक चव्हाण एक-दोन दिवसांमध्ये पुढील राजकीय दिशा ठरवणार आहेत. लवकरच आपण याबाबत भूमिका मांडणार असल्याचे त्यांनी सोमवारी माध्यमांशी बोलताना सांगितले. ते भाजपमध्ये जाणार असल्याची दाट शक्यता आहे.

News Title- Uddhav Thackeray has said that if BJP gives Rajya Sabha to Ashok Chavan, it will be an insult to martyrs
महत्त्वाच्या बातम्या –

“अशोक चव्हाण यांनी आमच्या पक्षात यावं”, केंद्रीय राज्यमंत्र्यांची खुली ऑफर

अशोक चव्हाणांनंतर काँग्रेसला अजून एक धक्का; आणखी एका नेत्याने सोडला ‘हात’

“विज्ञानाचे पुस्तक आठवत नसेल पण बायकांच्या शरीराबद्दल…”, बुमराहची पत्नी चाहत्यावर भडकली

जड्डूच्या घरात कौटुंबिक कलह! सासऱ्यांबद्दल प्रश्न विचारताच आमदार रिवाबाला राग अनावर

राज्याच्या ‘या’ भागात गारपिटीसह जोराचा पाऊस, हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी