राज्याच्या ‘या’ भागात गारपिटीसह जोराचा पाऊस, हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Maharashtra Weather Update | थंडीचा ओघ संपत नाही तोच राज्यात काही भागात वरुण राजाने हजेरी लावली. फेब्रुवारी महिना हा तसा उन्हाळ्याची चाहूल देणारा असतो. मात्र या महिन्यात पावसासह (Maharashtra Weather Update) गारपीटही झाल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. हवामान विभागाने याचा अंदाज वर्तवला होताच.

त्यानुसार काल (11 फेब्रुवारी) उपराजधानी नागपूरसह ग्रामीण भागातही जोरदार पाऊस झाला. चंद्रपूर, वर्धा जिल्ह्यांसह नागपूर जिल्ह्यातील मौदा, कुही व कामठी तालुक्यांना गारपिटीने जोरदार तडाखा दिला. तर शहरातही विजांसह वादळी पावसाने हजेरी लावली. विदर्भामध्ये आजही (12 फेब्रुवारी) जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

विदर्भात गारपीटीचा पाऊस

मध्यभारतात तयार झालेल्या ‘सायक्लोनिक सर्क्युलेशन ‘मुळे सध्या विदर्भात पावसाळी वातावरण आहे. शनिवारी यवतमाळ, अमरावती व वर्धा जिल्ह्यांमध्ये पाऊस व गारपिटीने धुमाकूळ घातल्याने पिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे. मौदा, कुही तालुके व कामठी परिसरात गारा पडल्या. अवकाळी पावसामुळे गहू, हरभरा, तूर, मिरची, टोमॅटो, कापूस, पालेभाज्या व अन्य पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे.

नागपूरमध्येही पाऊस झाला. उत्तर नागपुरातील (Maharashtra Weather Update) गोधनी, मानकापूरसह अनेक भागांमध्ये ताशी 30 ते 40 मी वेगाने सोसाट्याचा वाऱ्यासह जवळपास अर्धा तास पाऊस झाला. त्यामुळे राज्यातील काही भागांत हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

नांदेडमध्ये पिकांचं प्रचंड नुकसान

पावसाचा फटका नांदेड जिल्ह्यालाही चांगलाच बसला. नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर, हदगाव, उमरी, मुदखेड आणि किनवट तालुक्याला रविवारी वादळी वारा, अवकाळी पाऊस, गारपिटीचा फटका बसला. वादळी वाऱ्यामुळे रब्बीतील गहू व हरभरा पिकांचे नुकसान झाले आहे. तर, उमरी तालुक्यातील चार गावे, हिमायतनगर तालुक्यातील 13 गावे आणि किनवट तालुक्यातील धामणदरी या गावांमध्ये गारपीट झाली आहे. गारपीटीच्या पावसामुळे शेतकऱ्यांनी (Maharashtra Weather Update) पंचनामे करुन तातडीची आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी केली आहे.

राज्यातील ‘या’ भागांना यलो अलर्ट

हवामान विभागाच्या (Maharashtra Weather Update) अंदाजानुसार, आज विदर्भातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये पुन्हा पाऊस हजेरी लावू शकतो. त्यामुळे नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर, मराठवाडा आणि पश्‍चिम महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण अतिशय कमी राहील.

News Title- Maharashtra Weather Update Yellow alert for some areas

महत्त्वाच्या बातम्या –

मोठी गुड न्यूज! सोनं झालं स्वस्त, जाणून घ्या दर

अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची प्रकृती खालावली, तब्येतीबाबत मोठी अपडेट समोर!

पुणे पोलिसांच्या नाकाखालून गुन्हेगार पळाला!, शरद मोहोळच्या पत्नीला धमकावणारा ससूनमधून फरार

शोएबसोबतच्या घटस्फोटानंतर पहिल्यांदाच सानिया झाली स्पॉट; पापाराझींची घेतली फिरकी, Video

“राज्यात राष्ट्रपती राजवट कशासाठी लावा? तुमच्या काळात केंद्रीय मंत्र्याला…”, मुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर