“राज्यात राष्ट्रपती राजवट कशासाठी लावा? तुमच्या काळात केंद्रीय मंत्र्याला…”, मुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Eknath Shinde | राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा दाखला देत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी केली. याला प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारचा दाखला देत टीका केली. ते नागपूर जिल्ह्यातील रामटेक लोकसभा मतदारसंघात आयोजित शिवसंकल्प अभियानात बोलत होते. यावेळी शिंदेंनी विरोधकांना चारही मुंड्या चित करून पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदी बसवण्याचे आवाहन उपस्थित नागरिकांना केले.

भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस स्टेशनमध्ये केलेला गोळीबार आणि माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येमुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याचाच दाखला देत उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारवर सडकून टीका करताना राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी केली. ठाकरेंच्या टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारमधील घटनांचा पाढा वाचला.

मुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर

रामटेकमध्ये एकनाथ शिंदे म्हणाले की, हा फेसबुक लाईव्ह करणारा मुख्यमंत्री नसून लोकांमध्ये मिसळून लोकांचे प्रश्न सोडवणारा मुख्यमंत्री आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत भ्रष्टाचारामध्ये बुडालेल्या काँग्रेसला धडा शिकवायचा आहे. पुन्हा एकदा महायुतीचा झेंडा रामटेकवर फडकवायचा आहे. त्यामुळे जे घरी बसतात त्यांना कायमचे घरी बसवण्यासाठी 45 हून अधिक खासदार महाराष्ट्रातून निवडून आणण्याचा शिवसंकल्प पूर्ण करा.

तसेच काही लोक म्हणत आहेत की, राज्यात राष्ट्रपती राजवट लावा, पण राष्ट्रपती राजवट का आणि कशासाठी लावा? सरकार कोणताही गुन्हा करणाऱ्याला पाठीशी घालणार नाही, तुमच्या काळात हनुमान चालीसा म्हटली म्हणून जेलमध्ये घातले, केंद्रीय मंत्र्याला ताटावरून उठवून अटक केले गेले, गृहमंत्र्याला राजीनामा द्यावा लागला तरीही राष्ट्रपती राजवट लावली नाही मग आता काय झाले? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

 

Eknath Shinde यांचा विरोधकांवर हल्लाबोल

दरम्यान, लवकरच उत्तर प्रदेशातील अयोध्या या राम जन्मभूमी तीर्थक्षेत्राला भेट देणार असल्याचे शिंदेंनी सांगितले. ते म्हणाले की, रामचरण स्पर्शाने पावन झालेल्या रामटेकमधील रामाचे दर्शन आधी घेणार आणि त्यानंतरच अयोध्येला जाणार. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे विचार घेऊनच आपण पुढे जात आहोत.

अलीकडेच 22 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येतील भव्य राम मंदिराचे उद्घाटन पार पडले. मोदींच्या हस्ते रामललाचा अभिषेक सोहळा पार पडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या सर्व आमदारांसह अयोध्येला जाणार असल्याचे त्यांनी या आधीच स्पष्ट केले आहे.

News Title- Chief Minister Eknath Shinde criticized Uddhav Thackeray for demanding President’s rule
महत्त्वाच्या बातम्या –

माझ्या मुलाची विश्वासघाताने हत्या झाली, आमची बदनामी तात्काळ थांबवा; विनोद घोसाळकरांचे आवाहन

“रूग्णालयाला 2 कोटी दान कर नाहीतर 100 कोटींचा मानहानीचा खटला दाखल करेन”, पूनमच्या अडचणी वाढल्या

गृहमंत्र्यांच्या नागपुरात गुन्हेगारांचा हैदोस!, 48 तासात 3 हत्या, तर गेल्या 7 दिवसात 7 हत्या!

पुणे-नाशिक रेल्वे मार्गात मोठा बदल, देवेंद्र फडणवीसांनी दिली मोठी माहिती

पुन्हा ऑस्ट्रेलियाच ‘चॅम्पियन’! कांगारूंनी जिंकला वर्ल्ड कप; पराभवानंतर भारतीय कर्णधार भावूक