माझ्या मुलाची विश्वासघाताने हत्या झाली, आमची बदनामी तात्काळ थांबवा; विनोद घोसाळकरांचे आवाहन

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Vinod Ghosalkar । शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे दहिसर येथील माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले. नेते मंडळींनी विविध आरोप करत आरोपांच्या फैऱ्या सोडल्या. ठाकरे गटाच्या नेत्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली. अशातच अभिषेक घोसाळकर यांचे वडील आणि शिवसेनेचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांनी बदनामी थांबवण्याचे आवाहन केले आहे.

माझ्या मुलाची विश्वासघाताने हत्या झाली असून हा आमच्या कुटुंबावरील मोठा आघात असल्याचे त्यांनी सांगितले. माजी आमदार विनोद घोसाळकर यांनी एक निवेदन जारी करत बदनामी थांबवण्याचे आवाहन केले. माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. एखाद्या चित्रपटात घडतो तसा हत्येचा थरार प्रत्यक्षात घडल्याने राज्यात खळबळ माजली.

“तात्काळ बदनामी थांबवा”

फेसबुक लाईव्ह आणि नंतर हत्या करण्यात आली. हत्येच्या घटनेनंतर घोसाळकर यांच्याबाबत आक्षेपार्ह बाबी पसरवल्या जात असून याला लगाम घालण्यासाठी विनोद घोसाळकर यांनी किळसवाणा प्रकार थांबवण्याचे आवाहन केले. अभिषेक यांच्या हत्येनंतर राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा दाखला देत विरोधी पक्षातील नेत्यांनी सरकारला लक्ष्य केले. पण, वैयक्तिक वैमनस्यातून हत्या झाली असल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले.

विनोद घोसाळकर यांनी आवाहन करताना म्हटले, “माझा मुलगा अभिषेकची विश्वासघाताने निघृण हत्या करण्यात आली. या घटनेने आमच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यामुळे आमच्या या कठीण परिस्थितीत अश्लाघ्य आणि बिनबुडाचे आरोप करून माझी, माझ्या मुलाची आणि माझ्या कुटुंबाची बदनामी करण्याचा प्रकार सुरू आहे. तो तातडीने थांबवावा. असे कोणतेही खोटेनाटे आरोप सहन केले जाणार नाहीत. माझी आणि माझ्या कुटुंबाची बदनामी तात्काळ थांबवा.”

Vinod Ghosalkar यांचे आवाहन

विनोद घोसाळकरांनी आणखी सांगितले की, मी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण या सूत्राचे पालन करत असून 1982 पासून राजकारणात सक्रिय आहे. मी माझा मुलगा अभिषेक दोघेही निष्ठेने राजकारण आणि समाजकारण केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे आम्ही पाईक आहोत. कोणताही डाग आमच्यावर नाही.

तसेच आम्ही निष्कलंकपणे सामाजिक जीवनात वावरत आहोत. मी मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आलो. त्यानंतर विधानसभेत आमदार म्हणून गेलो. मुलगा अभिषेक आणि त्याची पत्नी आणि माझी सून तेजस्वी ही देखील नगरसेवक म्हणून निवडून आली. विभागातील जनतेचे प्रेम आणि विश्वास आम्हाला मिळाला. जनतेच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ दिला नाही आणि देणार नाही. त्यांची आम्ही नि:स्वार्थपणे सेवा केली आहे, असेही विनोद घोसाळकर यांनी नमूद केले.

News Title- Former corporator abhishek Ghosalkar was killed by treachery, Vindod Ghosalkar appeals to stop our defamation immediately
महत्त्वाच्या बातम्या –

“रूग्णालयाला 2 कोटी दान कर नाहीतर 100 कोटींचा मानहानीचा खटला दाखल करेन”, पूनमच्या अडचणी वाढल्या

गृहमंत्र्यांच्या नागपुरात गुन्हेगारांचा हैदोस!, 48 तासात 3 हत्या, तर गेल्या 7 दिवसात 7 हत्या!

पुणे-नाशिक रेल्वे मार्गात मोठा बदल, देवेंद्र फडणवीसांनी दिली मोठी माहिती

पुन्हा ऑस्ट्रेलियाच ‘चॅम्पियन’! कांगारूंनी जिंकला वर्ल्ड कप; पराभवानंतर भारतीय कर्णधार भावूक

जुन्नरचे माजी आमदार वल्लभ बेनके यांचं निधन, या कारणामुळे झाला मृत्यू