गृहमंत्र्यांच्या नागपुरात गुन्हेगारांचा हैदोस!, 48 तासात 3 हत्या, तर गेल्या 7 दिवसात 7 हत्या!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Nagpur | मागील काही दिवसांपासून राज्यात हत्येच्या घटना सातत्याने घडत असल्याचे निदर्शनास आले आहे. उल्हासनगर येथे आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात गोळीबार करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. तर, दहिसरमध्ये माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. राजधानी मुंबईजवळची शहरे या गोळीबाराने हादरली असताना उपराजधानी नागपूरमध्ये देखील गुन्हेगारांनी हैदोस घातला आहे.

नागपुरात 48 तासात 3 जणांच्या हत्या झाल्या आहेत. भरदिवसा होत असलेला गोळीबार हा चिंतेचा विषय आहे. यामुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. नागपुरात मागील आठवडाभरात एकूण सात जणांची हत्या झाली असून यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

48 तासात 3 हत्या

नंदनवन पोलीस स्थानकाच्या परिसरात एका 28 वर्षीय युवकाची निर्घृण हत्या करण्यात आली. हत्या झालेल्या तरूणाचे नीरज शंकर भोयर असे नाव आहे. दुसरी घटना देखील नंदनवन पोलीस स्थानकाच्याच हद्दीत घडली. कुंभार टोली या परिसरात सचिन उईके या व्यक्तीची हत्या झाली. तिसऱ्या घटनेत अज्जू इब्राहिम शेख या नावाच्या व्यक्तीला आपला जीव जमवावा लागला. ही घटना कळमा पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडली.

राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपुरातील आहेत. त्यामुळे गृहमंत्र्यांच्याच जिल्ह्यात झालेल्या या हत्यांनी फडणवीसांच्या टीकाकारांना आमंत्रण दिले. अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणावरून राज्याचे राजकारण चांगलेच तापले. शिवसेना ठाकरे गटाने फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी केली.

Nagpur मध्ये गेल्या 7 दिवसात 7 हत्या!

दरम्यान, नागपुरातील नंदनवन पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एका युवकाची हत्या झाली अन् परिसरात एकच खळबळ माजली. उधार घेतलेले पैसे परत न केल्यामुळे वाद झाल्याचे सांगितले जात आहे. याच वादातून 28 वर्षीय नीरज शंकर भोयर या तरूणाची हत्या करण्यात आली. दुसऱ्या घटनेत तर एका शुल्लक कारणावरून कामगाराला कायमचे संपवण्यात आले. कामगार कामावर येत नसल्याने त्याची हत्या करण्यात आली.

नंदनवन पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कुंभार टोली परिसरामध्ये चालक कामावर गैरहजर राहत असल्याने त्याची हत्या करण्यात आली. सचिन उईके असे चालकाचे नाव असून वाहतूकदाराने ही हत्या केली. तिसऱ्या घटनेत क्रिकेट खेळताना वाद झाला आणि तो हत्येपर्यंत पोहोचला. कळमा पोलीस स्टेशनच्या परिसरात ही हत्येची घटना घडली. क्रिकेट खेळत असताना वाद वाढत गेल्याने अज्जू इब्राहिम शेख या तरूणाचा मृत्यू झाला. त्याची हत्या करण्यात आली.

News Title- 3 murders in Nagpur in 48 hours, 7 murders in last 7 days
महत्त्वाच्या बातम्या –

जुन्नरचे माजी आमदार वल्लभ बेनके यांचं निधन, या कारणामुळे झाला मृत्यू

तो म्हणाला, भेटायला ये नाहीतर जीव देईन; नंतर कारमध्ये घालून… धक्कादायक प्रकाराने पुणे हादरलं!

लोकसभा निवडणुकीसाठी मतदारांची संख्या ‘इतक्या’ कोटींवर पोहोचली, आकडेवारी समोर

संपादक झाले रॅपर!, उमेश कुमावत यांच्या “थक गया मै साला” गाण्याचा इंटरनेटवर धुमाकूळ

‘कॅम्पा कोला’नंतर रिलायन्सनं खरेदी केली महाराष्ट्रातील ही प्रसिद्ध कंपनी!