पुणे-नाशिक रेल्वे मार्गात मोठा बदल, देवेंद्र फडणवीसांनी दिली मोठी माहिती

Pune Nashik Railway | पुणे आणि नाशिक या दोन महत्त्वांच्या शहरांना रेल्वे मार्गाने जोडण्यासाठी सरकार पावले टाकत आहे. मात्र, आता या मार्गात मोठा बदल करण्यात आला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. खरं तर पुणे आणि नाशिक या शहरांना जोडणारा अद्याप एकही रेल्वे मार्ग नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही शहरातील नागरिकांना मोठा दिलासा देत रेल्वे मार्ग होणार असल्याचे अलीकडेच जाहीर केले.

दोन्ही शहरांना रेल्वेने जोडण्यासाठी प्रस्ताव ठेवण्यात आला होता. प्रस्तावाला मंजुरी मिळाली असून 2500 कोटी रूपयांचा निधी देखील मंजूर झाला आहे. नाशिक आणि पुण्याला रेल्वे मार्गाने जोडण्याची जबाबदारी महारेलकडे सोपवण्यात आली आहे. भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली असून निधी देखील मंजूर झाला आहे.

फडणवीसांनी दिली मोठी माहिती

मात्र, या मार्गात मोठा बदल करण्यात आला असल्याचे फडणवीसांनी सांगितले. नाशिक-पुणे हा नियोजित रेल्वेमार्ग 235 किलोमीटरचा आहे. नाशिक-पुणे रेल्वे मार्ग बदलण्यात आला असून हा मार्ग 33 किलोमीटरने वाढणार आहे. कारण या मार्गात शिर्डी शहराला सामाविष्ट करण्याचा प्रस्ताव तयार केला जाणार आहे.

नव्याने नागरिकांच्या भेटीला येणार असलेल्या या मार्गावर 12 ते 16 कोचची रेल्वे धावेल. ही रेल्वे गाडी सेमी हायस्पीड असेल. रेल्‍वे मार्गाबाबत रेल्‍वे मंत्र्यांशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा केली. या रेल्वेच्या मार्गात येत असलेल्या अनेक बोगद्यांमुळे प्रकल्पाचे बजेट वाढेल म्हणूनच मार्ग बदलण्यात येणार असल्याचे कळते.

Pune Nashik Railway चा मार्ग बदलणार

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नाशिक-पुणे रेल्वेचा मार्ग हा 235 किलोमीटरचा आहे. नियोजित अर्थात आताच्या मार्गावर एकूण 20 स्थानक आहेत. 18 बोगदे आणि 19 उड्डाणपुल येतील. पण या मार्गातील बोगद्यांमुळे प्रकल्‍पाचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. यामुळे नाशिक-शिर्डी-पुणे असा पर्याय सुचवला जात आहे. रेल्‍वे मार्गाबाबत रेल्‍वे मंत्रालयाकडून विचार सुरू असून हा मार्ग बदलल्यामुळे 33 किलोमीटरने अंतर वाढणार आहे.

दरम्यान, नाशिक-शिर्डी-पुणे या रेल्वे मार्गाचा फायदा नाशिक, पुणे शहरासोबत शिर्डी शहराला देखील होईल. उपमुख्यमंत्र्यांनी दिलेला नवीन मार्गाचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळासमोर लवकरच मंजुरीसाठी सादर केला जाईल. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर नाशिक-पुणे प्रवास करणाऱ्यांच्या वेळेची मोठी बचत होईल. हे अंतर अवघ्या दोन तासांत गाठणे शक्य होणार असल्याचे फडणवीसांनी सांगितले.

News Title- Deputy Chief Minister Devendra Fadnavis has informed that there will be a major change in the Pune-Nashik railway route
महत्त्वाच्या बातम्या –

जुन्नरचे माजी आमदार वल्लभ बेनके यांचं निधन, या कारणामुळे झाला मृत्यू

तो म्हणाला, भेटायला ये नाहीतर जीव देईन; नंतर कारमध्ये घालून… धक्कादायक प्रकाराने पुणे हादरलं!

लोकसभा निवडणुकीसाठी मतदारांची संख्या ‘इतक्या’ कोटींवर पोहोचली, आकडेवारी समोर

संपादक झाले रॅपर!, उमेश कुमावत यांच्या “थक गया मै साला” गाण्याचा इंटरनेटवर धुमाकूळ

‘कॅम्पा कोला’नंतर रिलायन्सनं खरेदी केली महाराष्ट्रातील ही प्रसिद्ध कंपनी!