‘कॅम्पा कोला’नंतर रिलायन्सनं खरेदी केली महाराष्ट्रातील ही प्रसिद्ध कंपनी!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांनी आणखी एक प्रसिद्ध कंपनी विकत घेतली आहे.  महाराष्ट्रात सुमारे 82 वर्षांचा इतिहास असलेली एक कंपनी रिलायन्स उद्योग समूहाचे (Reliance Industries) अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी विकत घेतली आहे.

रिलायन्सनं खरेदी केली प्रसिद्ध कंपनी

रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्सने रावळगाव शुगर फार्मचा (Ravalgaon Sugar Farm Ltd) मिठाई व्यवसाय खरेदी केला आहे. यासाठी रिलायन्सने 28 कोटी रुपये मोजले आहेत. करारानुसार या कंपनीचे ट्रेडमार्क, पाककृती आणि बौद्धिक संपदा हक्क आता रिलायन्सकडे आले आहेत.

Mukesh Ambani | 28 कोटी रुपयांची झाली डील

पान पासंद चॉकलेट बनवणाऱ्या कंपनीनं शुक्रवारी एक्सचेंज फायलिंगमध्ये या डीलची माहिती दिली आहे. या कंपनीची स्थापना महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील रावळगाव गावात 1933 मध्ये व्यापारी वालचंद हिराचंद यांनी केली होती.

1942 मध्ये या कंपनीनं रावळगाव या नावानं टॉफी बनवण्यास सुरुवात केली. या कंपनीची रावळगावचे चॉकलेट्स आजही प्रसिद्ध आहेत. सध्या या कंपनीकडे मँगो मूड, कॉफी ब्रेक, टुटी फ्रूटी, पान पासंद, चोको क्रीम आणि सुप्रीम असे ब्रँड आहेत.

रिलायन्सनं आणखी एक नवा ब्रँड बाजारात आणला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या रिटेल कंपनीनं या महिन्याच्या सुरुवातीला आपला ग्राहक पॅकेज्ड वस्तूंचा ब्रँड ‘इंडिपेंडन्स’ लॉन्च केला होता. तर यापूर्वी या रिलायन्स कंपनीनं कॅम्पा खरेदी केली होती.

दरम्यान, मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आपला रिटेल व्यवसाय वाढवत असताना एकामागून एक नव्या क्षेत्रात प्रवेश करत आहेत. या क्रमानं कॅम्पा कोलासोबत त्यांनी कोला मार्केटमध्ये प्रवेश केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

आता कपिल देव करणार शेती!, महाराष्ट्राच्या ‘या’ भागात खरेदी केली शेतजमीन

पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण!, म्हाडाकडून 1 हजार 700 घरांबाबत महत्त्वाची घोषणा

बारामतीतून लोकसभेची निवडणूक लढणार?, शरद पवारांनी केली मोठी घोषणा

पुण्यातील भाजपच्या नेत्यांना केंद्रातून दणका, ‘या’ दोन प्रकरणांमुळे झापलं!

धनजंय मुंडेंवर अजित पवारांनी सोपवली महत्त्वाची जबाबदारी, सुनील तटकरेंनी केली मोठी घोषणा