Pune News: पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांच्यासह राष्ट्रवादीचे सर्वच प्रमुख नेते उपस्थित होते. या मेळाव्यामध्ये बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांनी एक मोठी घोषणा केली आहे.
धनंजय मुंडे यांच्यावर मोठी जबाबदारी!-
आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने भाजपशी (BJP Maharashtra) घरोबा केला असून सत्तेत मांडीला मांडी लावून बसले आहेत. महाराष्ट्रातीस 48 जागांपैकी जास्तीत जास्त जागा जिंकून पुन्हा एकदा मोदींना पंतप्रधान करण्याचा संकल्प अजित पवार यांनी सोडला आहे. या पार्श्वभूमीवर तसेच आपल्या हातात आलेली राष्ट्रवादी अधिक बळकट करण्यासाठी अजित पवार यांनी प्रयत्न सुरु केले आहेत. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून राष्ट्रवादीचे नेते आणि अजित पवार यांचे विश्वासू मानले जाणारे धनंजय मुंडे (NCP Leader Dhananjay Munde) यांच्याकडे मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकसभा प्रचार प्रमुखपदी धनंजय मुंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी याबाबतची घोषणा केली आहे. धनंजय मुंडे यांना राष्ट्रवादीची मुलुखमैदानी तोफ म्हणून ओळखलं जातं. भाजपच्या मुशीत तयार झालेल्या धनंजय मुंडे यांच्या वक्तृत्त्वाची नेहमीच चर्चा असते. त्यामुळे धडाकेबाज भाषण करणाऱ्या नेत्यावर अजित पवार यांनी ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.
धनंजय मुंडेंचा शरद पवार गटावर हल्लाबोल-
पुण्यात (Pune News Updates) पार पडलेल्या राष्ट्रवादीच्या युवक मेळाव्यात उपस्थितांना धनंजय मुंडे यांच्या धडाकेबाज भाषणाचा परिचय आला. या भाषणात धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटावर जोरदार हल्लाबोल केला.
2 जुलैला आम्ही सर्वांनी एक निर्णय घेतल, त्यानंतर 5 जुलैच्या सभेला खऱ्या अर्थाने लोकशाही दिसली. ती लोकशाही आजही इथं आहे. 6 फेब्रुवारीला त्या लोकशाहीचा विजय झाला. पक्ष आणि चिन्ह दोन्हीही आपले झाले. आता इथून पुढं फक्त अजित पर्व असणार आहे. पुढची 50 वर्षं ही फक्त दादांचीच आहेत, असं धनंजय मुंडे यांनी आपल्या भाषणात म्हटलं.
आपल्या भाषणात धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार (NCP-Sharadchandra Pawar) गटाला थेट इशारा दिला. अजितदादा आणि आम्हा सर्वांवर मर्यादा सोडून बोलाल तर आम्ही सुद्धा तुम्हाला सोडणार नाही, असं मुंडे यांनी म्हटलं. अजितदादांनी आम्हाला उभं केलं, त्यांच्यामुळंच आम्ही आमदार झालो. आता संपूर्ण पक्षाचा जर विचार केला तर सर्वात तरुण आमदार हे फक्त दादांनीच निवडून आणलेले आहेत, असा दावा देखील त्यांनी यावेळी बोलताना केला.
News Title: Pune News Dhananjay Munde get New responsibility
महत्त्वाच्या बातम्या-
सिंहगडावर घडला अत्यंत धक्कादायक प्रकार, शिवप्रेमी संतापले
मोठी बातमी! भाजप आमदाराच्या मुलाला अटक
“मुख्यमंत्रीसाहेब माझ्या नवऱ्याचं…”, मॉरिसच्या बॉडीगार्डच्या पत्नीचं मोठं वक्तव्य