सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

8th Pay commission |  देशामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांची सतत दिवाळी पाहायला मिळते. सरकारी कर्मचाऱ्यांना अनेक योजनांचा लाभ होतो. सध्या सातव्या वेतनावर सरकारी कर्मचारी आनंदी जरी असले तरीही त्यांना आठव्या वेतनाचे (8th Pay commission) वेध लागले आहेत. कारण दर दहा वर्षानंतर वेतन गठण केले जाते. यामुळे आता सरकारी कर्मचाऱ्यांना आठव्या वेतनाची आशा लागली आहे. यावर आता केंद्रसरकारने स्पष्टोक्ती दिली आहे.

खासदार रामनाथ ठाकूर यांनी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या आठव्या वेतन आयोगाचा आढावा घेण्याबाबत आठवा वेतन आयोग का लागू केला जात नाही? असा प्रश्न विचारला होता त्यावर अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी “सध्या सरकारचा कोणताही आठव्या वेतनाचा प्रस्ताव नसल्याचं सांगितलं आहे. सरकार सध्या नवीन वेतनाचा भार घेण्याच्या परिस्थितीमध्ये नाही”, म्हणून आठवा वेतन प्रस्ताव नसल्याचं सांगितल गेलं आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांना आठव्या वेतनाचं वेध

सरकारी कर्मचाऱ्यांना आठव्या वेतन आयोगाचे वेध लागले आहेत. पहिला वेतन आयोग हा 1947 मध्ये लागू करण्यात आला होता. तर सातवे वेतन आयोग 2014 मध्ये लागू करण्यात आला होता. त्यानंतर 10 वर्षे पूर्ण झाली आहेत. यामुळे आता सरकारी कर्मचाऱ्यांना आठव्या वेतन आयोगाचं वेध लागले आहे.

कर्मचारी आणि पेन्शनधारकांमध्ये आठव्या वेतन आयोगानंतर त्यांच्या वेतनात वाढ व्हावी अशी इच्छा व्यक्त केली जात आहे. सध्या देशभरामध्ये 48.62 लाख कर्मचारी असून 67.85 लाख पेन्शनधारक आहेत. सरकार कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता जाहीर करू शकते. एकूण 46 टक्के वेतनाचा महागाई भत्ता सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.

2014 मध्ये सातव्या वेतन आयोगाची स्थापना केली होती. त्यानंतर दोन वर्षानंतर म्हणजेच 1 जानेवारी 2016 मध्ये सातव्या वेतन आयोगाची शिफारस लागू करण्यात आली आहे. अशातच आता 2014 ते 2024 या दहा वर्षाच्या कालावधीनंतर पुन्हा आता केंद्रीय कर्मचारी सरकाकारकडे आठव्या वेतनाची मागणी करत आहेत.

दहा वर्षानंतर नवीन वेतन आयोग

केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ व्हावी या उद्देशानं वेतन आयोग दर दहा वर्षानंतर वेतनात वाढ करत नवीन वेतन आयोग स्थापन करण्याचं काम करते. याच पार्श्वभूमीवर वेतन आयोगाला नवीन वेतन आयोगासाठी नवीन अहवाल आणि शिफारशी सादर करण्यासाठी 18 महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. यावर सरकारने अद्यापही कोणतंही ठोस पाऊल उचललं नाही.

News Update – 8 Th pay commission news update

महत्त्वाच्या बातम्या

ऑस्ट्रेलियाला घाम फोडणाऱ्याला 3 कोटी मिळाले; वेस्ट इंडिजच्या नवख्या गोलंदाजाची IPL मध्ये एन्ट्री

लवकरच भारताचे रस्ते अमेरिकेसारखे बनतील; नितीन गडकरी यांचे मोठे विधान

पुण्यातील बुधवार पेठेत एकाचा वस्तऱ्याने गळा चिरला, अत्यंत धक्कादायक कारण आलं समोर

धक्कादायक! 20 महिलांवर अधिकाऱ्यांकडून सामूहिक बलात्कार; अंगणवाडीत नोकरी देण्याचं आमिष दाखवलं

पुस्तकांवर धूळ साचल्यानं कहाणी संपत नाही; संघातून वगळल्यानं भारतीय खेळाडूची खदखद