पुण्यातील बुधवार पेठेत एकाचा वस्तऱ्याने गळा चिरला, अत्यंत धक्कादायक कारण आलं समोर

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Pune News: पुण्याच्या बुधवार पेठेतील (Budhwar Peth) क्रांती चौकात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. वस्तऱ्याने गळा चिरून एकाचा खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी फरासखाना पोलिसांत (Faraskhana Police Station, Pune) तक्रार दाखल करण्यात आली आहे.

गुन्हा झालेला कळाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रं वेगानं फिरवली. गुन्हा करुन फरार झालेल्या आरोपीला पुणे रेल्वे स्थानक (Pune Railway Station) परिसरातून अटक करण्यात आली आहे.

नईम शेख असं खून झालेल्या इसमाचे नाव आहे. याप्रकरणी कलाम उर्फ रूबेल शेख या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या आरोपींची चौकशी केल्यानंतर या प्रकारामागीस धक्कादायक कारण समोर आलं आहे.

नेमका काय प्रकार घडला?

बुधवार पेठेतील वेश्यावस्तीत पश्चिम बंगालमधील एक महिला राहायला आहे. आरोपी कलाम शेख (Kalam Shaikh) तिचा पती आहे. 6 महिन्यांपूर्वी तिने कलाम शेखला सोडून नईम शेख याच्याशी विवाह केला होता तसेच दोघेजण एकत्र राहत होते.

पत्नीने दुसरा विवाह केल्याने कलाम शेखला राग अनावर झालेला होता. तो नईमवर पाळत ठेवून होता. बुधवार पेठेतील (Kranti Chowk, Budhwar Peth) क्रांती चौकात असलेल्या सागर बिल्डींगजवळ कलाम शुक्रवारी सायंकाळी थांबला होता, त्यावेळी नईम तेथे आला. यावेळी कलामने स्वतःच्या खिशातून वस्तरा काढला आणि थेट नईमच्या गळ्यावर वस्तऱ्याने वार केला.

अशाप्रकारे घेतलं आरोपीला ताब्यात-

कलामच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या नईमला तातडीने रुग्णालयात भरती करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या प्रकारानंतर पोलिसांपुढे आरोपीला अटक करण्याचं मोठं आव्हान होतं.

नईमवर हल्ला केल्यानंतर कलामने घटनास्थळावरून पळ काढला होता. तो साथीदारासोबत पश्चिम बंगालला पसार होण्याच्या तयारीत असल्याची माहिती फरासखाना पोलिसांना मिळाली. पोलिसांनी (Pune News) आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार सापळा लावला आणि पुणे रेल्वे स्थानक परिसरातून त्याला साथीदारासह रात्री उशीरा ताब्यात घेतले. घडलेल्या प्रकारामुळे बुधवार पेठ भागात दहशत निर्माण झाली आहे.

News Title: Pune News Budhwar peth faraskhana police news

महत्त्वाच्या बातम्या –

पुस्तकांवर धूळ साचल्यानं कहाणी संपत नाही; संघातून वगळल्यानं भारतीय खेळाडूची खदखद

‘चॅम्पियन’ सनरायझर्सवर पैशांचा पाऊस! काव्या मारनच्या संघाने दुसऱ्यांदा जिंकला किताब

तुझी पंतप्रधान होण्याची इच्छा आहे का? कंगनाचं उत्तर अन् पिकला एकच हशा