‘चॅम्पियन’ सनरायझर्सवर पैशांचा पाऊस! काव्या मारनच्या संघाने दुसऱ्यांदा जिंकला किताब

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Kavya Maran | आयपीएलच्या धर्तीवर दक्षिण आफ्रिकन ट्वेंटी-20 (SA20) लीग खेळवली जाते. या लीगच्या दुसऱ्या सत्रात शनिवारी 10 फेब्रुवारी रोजी सनरायझर्स इस्टर्न केप (Sunrisers Eastern Cape) संघाने इतिहास रचला आणि सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले. आपल्या संघाने विजय मिळवताच संघमालक काव्या मारनने एकच जल्लोष केला. अंतिम सामन्यात सनरायझर्स संघाने डर्बन सुपर जायंट्स संघाचा 89 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला.

खरं तर सनरायझर्सच्या संघाने आपले वर्चस्व कायम ठेवले असून सलग दुसऱ्यांदा किताब पटकावला आहे. एडन मार्करमच्या नेतृत्वाखाली सनरायझर्स इस्टर्न केप संघ विजेतेपद पटकावून किताबाचा मानकरी ठरला. किताबाशिवाय विजेत्या संघावर पैशांचा पाऊस झाला. सनरायझर्स इस्टर्न केपच्या संघाला बक्षीस (SAT20 2024 Prize Money) म्हणून मोठी रक्कम मिळाली.

‘चॅम्पियन’ सनरायझर्सवर पैशांचा पाऊस!

दक्षिण आफ्रिका ट्वेंटी-20 क्रिकेट लीगमध्ये सलग दुस-यांदा चॅम्पियन बनलेल्या सनरायझर्स इस्टर्न केप संघावर मोठ्या प्रमाणावर पैशांचा वर्षाव झाला आहे. एडन मार्करमच्या संघाला ट्रॉफीसह सुमारे 15.06 कोटी रुपयांची मोठी रक्कम देण्यात आली आहे. त्याच्याशिवाय अंतिम फेरीत पराभूत झालेल्या संघाला देखील मोठी रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले.

किताबासाठी अंतिम सामन्यात सनरायझर्स इस्टर्न केप आणि डर्बन सुपर जायंट्स हे संघ आमनेसामने होते. मात्र, डर्बनच्या संघाला अंतिम सामन्यात मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. पण, डर्बन सुपर जायंट्सलाही बक्षीस म्हणून मोठी रक्कम मिळाली. डर्बन सुपर जायंट्सला उपविजेते म्हणून जवळपास 7.31 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम देण्यात आली आहे.

Kavya Maran चा संघ दुसऱ्यांदा चॅम्पियन

डर्बन सुपर जायंट्सचा फलंदाज हेनरिक क्लासेनने SAT20 2024 मध्ये ‘प्लेअर ऑफ द सीझन’चा पुरस्कार जिंकला. यासाठी त्याला ट्रॉफी आणि 16.14 लाख रुपये मिळाले. या हंगामातील सर्वोत्तम गोलंदाज ओटनील बोर्टमन ठरला, त्याला 9.23 लाखांचे बक्षीस मिळाले. तर हेनरिक क्लासेनने या मोसमातील सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा पुरस्कार पटकावला. यासाठी त्याला 9.23 लाख रुपयांचे बक्षीस देण्यात आले.

SAT20 स्पर्धेतील चॅम्पियन संघ सनरायझर्स इस्टर्न कॅप आणि उपविजेत्या डर्बन सुपर जायंट्स व्यतिरिक्त, इतर चार संघांनाही मोठी बक्षीस रक्कम देण्यात आली आहे. या हंगामात तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या पारल रॉयल्सला 3.94 कोटी रुपये देण्यात आले आहेत. चौथ्या स्थानावर असलेल्या जॉबर्ग सुपर किंग्सला 3.47 कोटी रुपये, पाचव्या स्थानावर असलेल्या प्रिटोरिया कॅपिटल्सला 1.10 कोटी रुपये आणि शेवटच्या अर्थात सहाव्या स्थानावर असलेल्या MI कॅपिटल्सला 88.61 लाख रुपयांची बक्षीस रक्कम देण्यात आली आहे.

News Title- Kavya Maran’s Sunrisers Eastern Cape team has won the SA20 for the second time in a row

महत्त्वाच्या बातम्या –

तुझी पंतप्रधान होण्याची इच्छा आहे का? कंगनाचं उत्तर अन् पिकला एकच हशा

मोठी बातमी | राज ठाकरेंना मिळालेल्या बाबरीच्या वीटेबाबत मोठी घोषणा… 25 लाख रुपये…

संतोष बांगरच्या विधानावर रोहित पवारांचा पारा चढला; “तो काय महात्मा लागून गेलाय का?”

समीर वानखेडेंवर ईडीची कारवाई; “आर्यन खान प्रकरणात…” मोठं कारण आलं समोर

आशियातील ‘या’ 10 देशांंना पर्यटकांची मोठी पसंत, भेट देण्यासाठी वाढली लगबग