समीर वानखेडेंवर ईडीची कारवाई; “आर्यन खान प्रकरणात…” मोठं कारण आलं समोर

Sameer Wankhede |  गेल्या काही वर्षांमध्ये समीर वानखेडे हे चांगलेच चर्चेत आले होते. आर्यन खान ड्रग्स प्रकरणामुळे ते चांगलेच अॅक्टिव्ह मोडवर पाहायला मिळत होते. तेव्हापासून समीर वानखेडे अधिक प्रकाशझोतात आले आहेत. मात्र आता त्यांना ईडीनं समन्स बजावलं आहे. यामुळे आता पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहेत. लाच प्रकरणी ईडीने त्यांच्यावर कारवाई केली आहे.

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणामध्ये समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर ईडीनं लाच घेतल्याबाबत तक्रार केली आहे. त्यामुळे 29 ठिकाणी धाड टाकण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. समीर वानखेडेंसोबतच इतर चार व्यक्तींची देखील चौकशी करण्यात आली असल्याची माहिती आता समोर आली आहे. 25 कोटींची लाच घेतली असल्याची माहिती आहे. त्यातील 50 लाख रूपये हा पहिला हप्ता होता, त्यामुळे आता मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात समीर वानखेडे अडकले आहेत.

समीर वानखेडेंसह (Sameer Wankhede Ed)इतर लोकांचा समावेश 

समीर वानखेडेंसह इतर लोकांचा देखील या प्रकरणामध्ये समावेश आहे. तर काही एनसीबीशी संबंधीत आहेत, असा आरोप आहे. यामध्ये काही लोकांची चौकशी केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. या सर्वांना ईडी कार्यालयामध्ये चौकशीसाठी बोलावलं आहे. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणापासून ते चांगलेच चर्चेत आले आहेत.

ईडीकडून मनी लॅान्ड्रिंगचा गुन्हा (Money laundering case)

आर्यन खान प्रकरणामध्ये 25 कोटी लाच घेतल्या प्रकरणी आणि त्यातील 50 लाख पहिला हप्ता दिल्या प्रकरणी समीर वानखेडे आणि इतर काही व्यक्तींवर मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयनं केलेल्या कारवाईविरोधात आणि कायदेशीर दंडात्मक कारवाईची मागणी उच्च न्यायालयाकडे केली होती. यामुळे ईडीनं एफआयआरचा आधार घेत ईडीनं मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला.

काय म्हणाले समीर वानखेडे?

ईडीने समन्स बजावल्या प्रकरणी समीर वानखेडेनं आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्यावर सीबीआयनं कारवाई केल्यानंतर उच्च न्यायालायात याचिका दाखल केली होती. यामुळे नंतर ईडीनं एफआयआरचा आधार घेत समीर वानखेडेवर गुन्हा दाखल केला आहे. यावर समीर वानखेडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, ‘2023 मध्ये सीबीआयची कारवाई आणि आता ईडीने केलेली अचानक कारवाई सूड आणि द्वेशाची भावना आहे”.

शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानवर ड्रग्ज प्रकरणावरून अनेक आरोप करण्यात आले होते. यामुळे नंतर आर्यन खानला एनसीबीकडून 3 ऑक्टोंबरला अटक करण्यात आली होती. यावेळी समीर वानखेडेंनी हे प्रकरण हाताळलं होतं. तेव्हापासून समीर वानखेडे याप्रकरणामुळे चर्चेत आले होते. त्यानंतर आर्यन खानची तापासणी आणि चौकशी केल्यानंतर 27 मार्च 2023 ला याप्रकरणी क्लीनचीट देण्यात आली. संबंधीत प्रकरण हे कार्डेलिया क्रूझवरून घडले होते. या ठिकाणी आर्यन खान आणि आरबाज मर्चंट याचं नाव शेवटच्या क्षणी सीबीआयनं घेतलं आहे.

News Title – Sameer Wankhede Ed money laundering case 

महत्त्वाच्या बातम्या

मॉरिसनं 10 दिवसांपूर्वी टाकलेल्या पोस्टमध्ये दिले होते संकेत, काय होती ती पोस्ट?

“गाडीखाली श्वान आलं तरी…”, घोसाळकरांच्या हत्येनंतर फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया

“रविंद्रला क्रिकेटर नसतं बनवलं तर बरं झालं असतं”

“घोसाळकरांची हत्या करणाऱ्या मॉरिसला शिंदेंनी दिली होती ऑफर”, नव्या दाव्याने मोठी खळबळ

बापाकडूनच पोटच्या मुलीवर बलात्कार, 14 वर्षांची मुलगी गर्भवती झाल्याने प्रकार उजेडात