मॉरिसनं 10 दिवसांपूर्वी टाकलेल्या पोस्टमध्ये दिले होते संकेत, काय होती ती पोस्ट?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Abhishek Ghosalkar Murder | गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं आहे. यामुळे आता कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित राहत आहेत. ठाकरे गटाचे नगरसेवक अभिषेक घोसाळकरची दहिसर येथे गोळ्या घालून हत्या (Abhishek Ghosalkar Murder) करण्यात आली आहे. त्यानंतर गुन्हेगारानं स्वत:लाही गोळी घातली असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. वैमनस्यातून हा प्रकार घडला असल्याची माहिती आता समोर आली आहे. नियोजनबद्ध कट रचून हत्या केली असल्याचं बोललं जात आहे.

गेल्या काही वर्षांआधी गुन्हेगार माॅरिस आणि अभिषेक यांच्यामध्ये अनेक वर्षांपासून निवडणुकींवरून वाद सुरू होता. त्यानंतर तो वाद मिटवण्यासाठी माॅरिसने घोसाळकरांची बॅनरबाजी केली होती. त्यानंतर ते दोघेही एकत्रित आले होते. त्यांनी एकत्र कामं देखील केली होती. मात्र 8 फेब्रुवारी रोजी माॅरिसने फोन करून साड्या वाटपाच्या कारणानं कार्यालायमध्ये बोलावलं आणि त्याठिकाणी त्याच्यावर 5 गोळ्या झाडण्यात आल्या. यामुळे वातावरण तापलं आहे. त्याच्या एका सोशल मीडिया पोस्टनं अनेकांचं लक्ष वेधलं आहे. त्यावरून हे सर्व नियोजनबद्ध केलं असल्याची माहिती आता समोर येत आहे.

काय आहे पोस्ट?

धक्कादायक प्रकार घडण्याच्या 10 दिवसांआधी माॅरिसने आपल्या सोशल मीडिया हँडेलवर एक पोस्ट शेअर केली होती. त्या पोस्टनं आता सर्वांचं लक्ष वेधलं आहे. त्यानं आपला स्वत:चा एक फोटो शेअर करत पोस्ट लिहिली. “तुम्ही अशा माणसाचा कधीच पराभव करू शकत नाही ज्याच्याकडे वेदना, नुकसान अनादर आणि नकार याची त्याला परवा नाही,” या पोस्टमुळे हा नियोजनबद्ध कट असल्याचं बोललं जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार माॅरिसने घोसाळकर यांना गोळ्या झाडल्यानंतर स्वत:वरही गोळी झाडली आहे. यानंतर घोसाळकर यांचं पार्थिव शवविच्छेदनासाठी जे जे रूग्णालयामध्ये नेण्यात आलं. तर माॅरिसचं पार्थिव हे कूपर रूग्णालयामध्ये नेण्यात आलं.

याप्रकरणाचा राज्यातील राजकारणाशी संबंध लावला जात आहे. कारण काही दिवसांआधी माॅरिस हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेला असता त्यांच्यासोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. यामुळे अभिषेक घोसाळकर प्रकरणाचा संदर्भ हा थेट राजकारणाशी लावला जात आहे.

कोण आहे माॅरिस? 

माॅरिस हा बोरीवलीतील एक भाई आहे. कोरोना काळामध्ये त्यानं अनेक कामं केली होती. त्याला कोरोना योद्धा पुरस्कारानं देखील सन्मानित करण्यात आलं होतं. त्याच्या आणि अभिषेक घोसाळकर यांच्यामध्ये जुना वाद होता अशा चर्चा आहेत. त्याला अभिषेक घोसळकरच्या प्रभागातून निवडणूक लढवायची होती अशा चर्चा आहेत.

News title – Abhishek Ghosalkar Murder news update

महत्त्वाच्या बातम्या

“घोसाळकरांची हत्या करणाऱ्या मॉरिसला शिंदेंनी दिली होती ऑफर”, नव्या दाव्याने मोठी खळबळ

बापाकडूनच पोटच्या मुलीवर बलात्कार, 14 वर्षांची मुलगी गर्भवती झाल्याने प्रकार उजेडात

“तुरुंगातून आल्यापासून मॉरिस सारखा म्हणायचा…”, पत्नीचा धक्कादायक खुलासा

प्रसिद्ध मंदिरात पुजाऱ्यांच्या जागांसाठी मेगा भरती, 90 हजार रुपये मानधन सुद्धा मिळणार!

आधी जवळीकता वाढवली नंतर…; अभिषेक घोसाळकरांना मारण्याचं आधीच झालेलं प्लॅनिंग