“तुरुंगातून आल्यापासून मॉरिस सारखा म्हणायचा…”, पत्नीचा धक्कादायक खुलासा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Abhishek Ghosalkar case | स्थानिक गुंड अशी ओळख असलेल्या मॉरिस नरोना याने फेसबुक लाईव्ह सुरू असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar case) यांची गोळ्या झाडून हत्या केली. यांच्यात चांगले संबंध असताना मॉरिसने असे का केले, हा प्रश्न सर्वांन पडला आहे. या प्रकरणामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे.

मॉरिसच्या पत्नीचा धक्कादायक खुलासा

आता या प्रकरणी (Abhishek Ghosalkar case) मॉरिस नरोनाच्या पत्नीने ( Mauris Bhai Wife) पोलीस जबाबात धक्कादायक खुलासा केला आहे. मॉरिसची पत्नी घोडबंदर येथे राहत असल्याची माहिती मिळत आहे. तिने पोलिसांना जबाब देत धक्कादायक खुलासे केले आहेत. मॉरिस अनेकदा मी अभिषेकला सोडणार नाही असं म्हणत होता, असा खुलासा त्याच्या पत्नीने केला असल्याची माहिती समोर आली आहे.

“मी मॉरिसकडे जास्त लक्ष दिलं नाही. पण, तो कायम मी अभिषेकला सोडणार नाही असं म्हणायचा.”, असे त्याच्या पत्नीने म्हटलं आहे. तसेच बलात्कार प्रकरणी मॉरिसला तुरुंगवासही झाला होता. 5 महीने तो जेलमध्ये राहिला आहे. या प्रकरणी तो जामिनावर बाहेर आला होता. आपल्या अटकेमागे अभिषेकच असल्याचं त्याला वाटायचं. याचाच राग त्याच्या मनात होता.”, असं मॉरिसच्या पत्नीने सांगितलं आहे.

मॉरिसने एका व्यक्तीला काही पैसे दिले होते. दिलेले पैसे परत करत नसल्याने मॉरिसने त्याच्या पत्नीला त्रास द्यायला सुरुवात केली. या महिलेने पुढे अभिषेकची मदत घेत मॉरिसविरोधात तक्रार दिली होती. त्यामुळे त्याला अटक झाली होती. या सर्व प्रकरणमागे अभिषेकचा हात असल्याची मॉरिसची समज होती. याच कारणाने त्यांच्यात गैरसमज होऊन वाद झाल्याचे पोलिसांना संशय येत आहे.

अभिषेक-मॉरिसमध्ये राजकीय वाद

अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar case) यांची पत्नी आयसी कॉलनीमध्ये सध्या प्रभाग एकमध्ये नगरसेविका आहे. याच जागेवर मॉरिसला लढायचं होतं. या राजकीय वादातून मॉरिसच्या मनात राग निर्माण झाला. शिवाय बलात्कार गुन्हा अभिषेकच्या म्हणण्यावरून दाखल झाल्याचंही मॉरिसला वाटायचं, म्हणून त्यांच्यात हे वैराचे संबंध तयार झाले असल्याचं आता म्हटलं जात आहे.

दरम्यान, मॉरिस आणि अभिषेक यांच्यामध्ये काही दिवसांपासून हे अंतर्गत वाद होते. ते मिटवण्यासाठी ख्रिसमसच्या वेळी मॉरिसने अभिषेकचे बॅनर पोस्टर लावून जवळीक वाढवली होती. यानंतर गुरुवारी सकाळी (8 फेब्रुवारी) मॉरिसने अभिषेक यांना फोन लावून संध्याकाळी महिलांना साड्या वाटपाचा कार्यक्रम असल्याचं सांगून बोलावलं. या कार्यक्रमापुर्वी मॉरिसने अभिषेकला फेसबुक लाईव्ह करण्यासाठी त्याच्या ऑफिसमध्ये नेलं आणि इथेच त्याच्यावर गोळ्या झाडून त्याची हत्या केली.

News Title-  Abhishek Ghosalkar case Mauris Bhai Wife Big Revelation

महत्त्वाच्या बातम्या –

खुशखबर! सोने-चांदीच्या भावात मोठी घसरण; जाणून घ्या आजचे दर

“महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्था राखायची असेल तर 48 तासांसाठी…”

अभिषेक घोसाळकर हत्येप्रकरणी धक्कादायक माहिती समोर!

अभिषेक घोसाळकरांच्या हत्येनंतर सरकारने घेतला महत्वाचा निर्णय!

‘या’ राशीच्या सर्व मनोकामना आज पूर्ण होतील!