Abhishek Ghosalkar murder case | महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. सलग घडलेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे विरोधक चांगलेच संतापले आहे. गुरुवारी (9 फेब्रुवारी) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar murder case) यांची स्थानिक गुंड अशी ओळख असलेल्या मॉरिस नरोना याने फेसबुक लाईव्ह सुरू असतानाच गोळ्या झाडून हत्या केली.
या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. या घटनेत गंभीर जखमी झालेले घोसळकर यांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे हे प्रकरण अजूनच तापलं आहे. आता या संबंधी एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. अभिषेक घोसाळकर यांचे निकटवर्तीय आणि या प्रकरणातील साक्षीदाराने धक्कादायक हकीकत सांगितली आहे.
अभिषेक घोसाळकर यांच्या निकटवर्तीयाने सांगितला थरार
दहिसर येथील आयसी कॉलनीतील मॉरिस भाईच्या कार्यालयात गुरुवारी संध्याकाळी ही घटना घडली. गोळीबार झाला तेव्हा मॉरिसच्या कार्यालयात मेहुल पारेख नामक व्यक्तीही उपस्थित होता. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याची चौकशी केली जात आहे. आता अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणातील (Abhishek Ghosalkar murder case ) साक्षीदार लालचंद पाल यांनी काही धक्कादायक माहिती सांगितली आहे.
साक्षीदार लालचंद पाल हे हत्येपुर्वी घोसाळकर यांच्यासोबतच होते. घोसाळकर यांना मॉरिस यांच्या कार्यालयात जाण्यापूर्वी काय घडले, याची सर्व हकीकत पाल यांनी सांगितली आहे. गुरुवारी सकाळी अभिषेक घोसाळकर यांना मॉरिसचा फोन आला होता. तेव्हा पाल त्यांच्यासोबतच होते. गोळीबार झाला तेव्हा घटनास्थळीच असलेल्या पाल यांनी नेमकं काय घडलं?, याचा सर्व तपशील सांगितला आहे.
नेमकं काय घडलं?
मॉरिस आणि अभिषेक (Abhishek Ghosalkar murder case ) यांच्यामध्ये काही दिवसांपासून अंतर्गत वाद होते. ते मिटवण्यासाठी ख्रिसमसच्या वेळी मॉरिसने अभिषेकचे बॅनर पोस्टर लावून जवळीक वाढवली होती. यानंतर गुरुवारी सकाळी (8 फेब्रुवारी) मॉरिसने अभिषेक यांना फोन लावून संध्याकाळी महिलांना साड्या वाटपाचा कार्यक्रम असल्याचं सांगून बोलावलं. या कार्यक्रमापुर्वी मॉरिसने अभिषेकला फेसबुक लाईव्ह करण्यासाठी त्याच्या ऑफिसमध्ये नेलं. मी त्यांच्यासोबत होतो, पण आत गेल्यानंतर मॉरिसने मला बाहेर काढलं, असं साक्षीदार लालचंद पाल यांनी सांगितलं आहे.
मी बाहेर उभा होतो. थोड्या वेळाने बंदुकीच्या गोळीचा आवाज आला आणि मी धावतच आत गेलो. तेव्हा, अभिषेक खाली पडला होता आणि मॉरिस त्याच्यावर गोळीबार करत होता. बंदुकीतील गोळी संपल्यानंतर सुद्धा मॉरिस सतत अभिषेकवर गोळीबार करत असल्याचं पाल यांनी सांगितलं. या घटनेचा आता सखोल तपास केला जात आहे.
News Title- Abhishek Ghosalkar murder case new update
महत्त्वाच्या बातम्या –
ठाकरे गटाला मोठा धक्का!, ‘हा’ आमदार शिंदे गटात जाणार?
“घोसाळकरांच्या हत्येची घटना धक्कादायक, पूर्वी अशा बातम्या फक्त बिहार आणि उत्तर प्रदेशमधून यायच्या”
बांगलादेशमध्ये टीम इंडियावर दगडफेक! फायनलमध्ये गोंधळ, भारताचे विजेतेपद काढून घेतले
मी घरात देखील शॉर्ट्स घालू शकत नव्हते; घटस्फोट अन् ईशा देओलचे ‘ते’ विधान चर्चेत