Ravindra Waikar | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर आता सरकार उभं राहून एक वर्ष होऊन गेलं आहे. मात्र तरीही उद्धव ठाकरे गटातून एक एक आमदार, कार्यकर्ता शिंदे गटामध्ये प्रवेश करत आहे. ठाकरे गटामध्ये असलेल्या आमदारांना आणि इतर नेत्यांना एकनाथ शिंदेंसोबत काम करायचं असल्याची चर्चा आहे. यामध्ये रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांचं नाव चर्चेत असल्याची माहिती समोर आली आहे.
आगामी लोकसभा निवडणूक जवळ येऊ लागली आहे. यामुळे अनेक नेते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करताना दिसत आहेत. अशातच आता ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर हे एकनाथ शिंदे गटामध्ये जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. काही दिवसांआधी रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांच्यावर ईडी कारवाई करण्यात आली होती. याआधी देखील त्यांच्यावर अनेकदा ईडी कारवाई करण्यात आली होती. अचानक आता ते शिंदे गटाच्या वाटेवर जाण्याच्या चर्चा होताना दिसत आहेत.
एकनाथ शिंदे आणि रवींद्र वायकर यांच्यात बैठक
एकनाथ शिंदे आणि रवींद्र वायकर यांच्यामध्ये अनेकदा गुप्त बैठका झाल्याची माहिती समोर आली आहे. जर असं घडलं तर ठाकरे गटाला धक्का बसण्याची चिन्हे आहेत. मात्र अजूनही यावर अधिकृत माहिती समोर आली नाही. यावर बोलत असताना शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे गटावर निशाणा साधला आहे.
काय म्हणाले संजय शिरसाट?
शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी या प्रकरणावर भाष्य केलं. “एकनाथ शिंदे यांच्यासोबत अनेकांना काम करायची इच्छा आहे. उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते कंटाळले असल्यानं ते आता शिंदे गटामध्ये येत आहेत. अनेकांना धमक्या आमि ब्लॅकमेल करत असल्याचा प्रकार सुरू आहे. बाळासाहेबांचे विचार घेऊन जाणाऱ्या एकनाथ शिंदेंसोबत अनेकजण इच्छूक आहेत”, अशी माहिती संजय शिरसाट यांनी दिली.
काय म्हणाले संजय राऊत?
संजय राऊत यांनी संजय शिरसाट यांच्या प्रतिक्रियेवर टीका केली आहे. “ठाकरे यांना सोडा नाहीतर तुरूंगात चला”, अशा धमक्या रवींद्र वायकर यांना दिल्या आहेत. रवींद्र वायकरांना काही दिवसांआधी ईडीची नोटीस बजावण्यात आली होती. यावर संजय राऊत यांनी पलटवार केला आहे. त्यानंतर त्यांनी “हा एक प्रकारचा दहशतवाद” असल्याचं ते म्हणाले आहेत.
एकाबाजूला शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट या दोन्हीगटांमध्ये अनेक नेते आणि आमदार हे शिंदे गटात येताना दिसत आहेत. यापैकी दुसरी बाजू पाहिल्यास काँग्रेसचे माजी आमदार बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेसला राम राम ठोकल्यानं राज्यामध्ये काँग्रेसची पडती बाजू पाहायला मिळत आहे.
News Title – Ravindra Waikar will go to Shivsena Shinde group
महत्त्वाच्या बातम्या
सर्वात मोठी बातमी; ठाकरे गटाच्या नेत्यावर गोळीबार, मुंबई हादरली
शेतकरी पेन्शन योजनेची घोषणा, शेतकऱ्यांना दरमहा मिळणार 3 हजार रुपये!
कॉमेडियन कपिल शर्मा मोठ्या अडचणीत; थेट ईडीकडे केली तक्रार
महाराष्ट्रातील हवामानात बदल, ‘या’ भागात पावसाची शक्यता!
प्रसिद्ध अभिनेत्री Yami Gautam ने चाहत्यांना दिली मोठी गुड न्यूज!