महाराष्ट्रातील हवामानात बदल, ‘या’ भागात पावसाची शक्यता!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Weather Update | राज्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने बिघाड होत असतानाचं चित्र पहायला मिळत आहे. राज्याच्या काही भागात अजून सुद्धा थंडी आहे. तर काही ठिकाणी उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. उन्हामुळे गरमी देखील जाणवत असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र एकीकडे हवामानात बदल होत असताना दुसरीकडे काही ठिकाणी ढगाळ वातवरणाचं चित्र पहायला मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांसमोर पुन्हा एकदा मोठं अव्हान आहे.

राज्यात पुन्हा पावसाचं कमबॅक-

हवामान (Weather Update) तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी हवमानाबदल काही महत्त्वाची माहिती दिली आहे. खुळे म्हणाले की, (11 फेब्रुवारी) पर्यंत महाराष्ट्राच्या काही भागात मध्यम थंडीचा अंदाज राहिल. तर ढगाळ वातावरणाने थंडी काहीशी कमी झाली आहे. सध्या कमाल व किमान दोन्हीही तापमाने सरासरीपेक्षा वाढीव असली तरी रात्री तसेच पहाटे थंडी ही जाणवतच असल्याचं देखील खुळे म्हणाले. पुढे खुळे म्हणाले काही ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवत असल्याचे खुळे म्हणाले.

‘या’ ठिकाणी पडणार पाऊस

खुळेंनी दिलेल्या माहितीनूसार, मध्य महाराष्ट्रात नंदुरबार, धुळे, जळगांव, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर अशा एकूण 10 जिल्ह्यात पुढील (Weather Update) 2 दिवसात पावसाची शक्यता आहे. शिवाय या भागात ढगाळ वातावरण देखील राहणार आहे. तर 9 आणि 10 फेब्रवारीला मराठवाड्यात सुद्धा पाऊस पडणार असल्याचं म्हटलं जात आहे.

या सोबतच विदर्भातील सर्व जिल्ह्यात दिनांक 10 ते 14 फेब्रुवारीपर्यंत पाऊस पडणार आहे. कारण या दिवसात विदर्भात पावसाची शक्यता अधिकच जाणवत असल्याची माहिती माणिकराव खुळे यांनी दिली. शिवाय मुंबईसह कोकणातील 7 जिल्ह्यात आकाश केवळ निरभ्रच राहण्याची शक्यता आहे. सध्या जी काही थंडी पडत आहे, तशीच थंडी जाणवणार आहे. पावसाची शक्यता मात्र जाणवत नसल्याची माहिती माणिकराव खुळे यांनी दिली आहे.

भारतात पावसाची शक्यता

हवामान विभागाने आजपासून (Weather update) अरुणाचल प्रदेशसह पश्चिम बंगाल, नागालँड, मेघालय, आसाम, त्रिपुरा, मिझोराम, मणिपूर याठिकाणी पावसाची शक्यता वर्तवली आहे. 9 ते 11 फेब्रुवारी दरम्यान उत्तर भारतात पावसाची शक्यता देण्यात आली आहे. तसेच, पूर्व विदर्भ ते तेलंगणा, कर्नाटक पर्यंत कमी दाबाचा पट्टा कायम असल्याने विदर्भ आणि मराठवाड्यातही पाऊस पडू शकतो.

News Title : weather update rain chances in Maharashtra

महत्त्वाच्या बातम्या-

मोठी बातमी! विकी कौशलचा अपघात, प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती समोर

बाजारात धुमाकूळ घालणार ‘ही’ इलेक्ट्रिक बाईक, 10 रूपयांमध्ये धावेल 110KM

काय आहे मोदी सरकारची लखपती दीदी योजना?; महिलांसाठी फायदाच फायदा

लोन घेणारांसाठी मोठी गुड न्यूज; RBI नं केली सर्वात मोठी घोषणा!

गुंडांनी गुंडांसाठी चालवलेलं राज्य!, संजय राऊतांनी टाकलेल्या नव्या फोटोमुळे राज्यात खळबळ